काही धर्मांमध्ये लग्नानंतर किस करण्याचा रिवाज आहे. फिलिपिन्समध्ये एकाच मांडवात २०० जोडप्यांनी लग्न केलं. आणि त्यांचं हे लग्न एकमेकांना केलेल्या किसमुळे चर्चेत आहे. गेल्या महिन्यात कोरोना व्हायरसच्या भितीमुळे लोक मास्कचा वापर करत आहेत. मग अशात या लग्नातील जोडप्यांनी सुद्धा मास्क लावले होते. अशात लग्न झाल्यावर रिवाज तर पूर्ण करायचा आहे. अशात या कपल्सनी मास्क घालूनच एकमेकांना किस केलं. याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
हा लग्न सोहळा गुरूवारी बॅकॉलॉड शहरात पार पडला. यात २२० कपल्सनी एकमेकांसोबत आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेतली. आणि निळ्या रंगाचे सर्जिकल मास्क घालून एकमेकांना किस केलं.
लग्नाआधी जोडप्यांकडून त्यांच्या आरोग्याबाबत आणि गेल्या १४ दिवसातील प्रवासांची माहिती मागवण्यात आली होती. सगळेजण ग्रेट हॉलमध्ये एकत्र जमले आणि हा समारंभ पार पडला.
३९ वर्षीय जॉन पॉल हा सुद्धा त्याच्या पार्टनरसोबत या लग्न सोहळ्यात सहभागी झाला होता. त्याच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. तो म्हणाला की, 'मास्क लावून किस करणं फारच वेगळा अनुभव होता. पण हे गरजेचं होतं. खासकरून तेव्हा जेव्हा तिथे खूप गर्दी होती'.
रिपोर्ट्सनुसार, या लग्नात सहभागी होण्यापूर्वी जोडप्यांना सर्जिकल मास्क आणि सॅनिटायजर देण्यात आलं होतं. अशाप्रकारे सामूहिक विवाह सोहळा साउथ इस्ट आशिया आणि दक्षिण कोरियामध्ये नेहमीच होत असतात.
चीननंतर कोरोना व्हायरसमुळे एखाद्याचा मृत्यू झालेला फिलिपीन्स हा पहिला देश होता. आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या २ हजारपेक्षा जास्त झाली आहे.