शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

गणिताचा जुगाड करून एक-दोन नाही तर 14 वेळा जिंकला जॅकपॉट, 2.5 अब्ज रूपये कमावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 11:47 AM

एक व्यक्ती असाही आहे ज्याने आयुष्यात एक-दोन वेळा नाही तर 14 वेळा जॅकपॉट आपल्या नावावर केला. त्याने इतके पैसे जिंकले ज्यांचा त्याने कधी विचारही केला नसेल.

आयुष्यात वेगवेगळ्या समस्या असल्या की, एकदा तरी असं वाटतं एखादी लॉटरी लागावी आणि सगळ्या दूर व्हाव्या. पण सगळ्यांच्या नशीबात हे नसतं. जास्तीत जास्त लोकांसाठी हे स्वप्नच राहतं. एका रिपोर्टनुसार, 1.4 लोकांपैकी एकच कुणीतरी लॉटरी जिंकू शकतो. तेही त्यांच्या आयुष्यात केवळ एकदाच. पण एक व्यक्ती असाही आहे ज्याने आयुष्यात एक-दोन वेळा नाही तर 14 वेळा जॅकपॉट आपल्या नावावर केला. त्याने इतके पैसे जिंकले ज्यांचा त्याने कधी विचारही केला नसेल.

रोमानियामध्ये जन्मलेला ऑस्ट्रेलियन नागरिक आणि गणितज्ञ स्टीफन मंडेल यांनी हा कारनामा केला आहे. आपल्या बुद्धीने गणित करून त्यांनी लॉटरी सिस्टीमला हॅक केलं. त्यामुळे जेव्हाही ते लॉटरी खरेदी करत होते तेव्हा अंदाज लावत होते. जो बरोबर निघत होता. तेही छोटी रक्कम नाही तर थेट लॉटरीचा जॅकपॉट.  

एका खास फार्मूल्याचा वापर करत ते 5 नंबर काढत होते आणि सहाव्या नंबरचा अंदाज लावून योग्य तिथे पैसे लावत होते. त्यांची पहिली लॉटरी इतकी मोठी लागली की, ते रोमानिया सोडून आपल्या परिवारासोबत ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट झाले.

ऑस्ट्रेलियात एकापाठी एक 12 लॉटरी लागल्या

स्टीफन मंडेल यांनी नोकरी दरम्यान जास्त पैसे कमावण्यासाठी 1960 मध्ये लॉटरी लावणं सुरू केलं. ऑस्‍ट्रेलियामध्ये पोहोचून त्यांनी रोमानिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत लॉटरी खरेदी केल्या. प्रत्येक वेळी ते जिंकले. झालं असं की, लॉटरीचे अधिकारी हैराण झाले. त्यांनी मंडेल यांना रोखण्यासाठी कठोर नियम तयार केले. एका व्यक्तीकडून सगळे तिकिट खरेदी करण्यावर बंदी घातली. पण याचा काही फायदा झाला नाही. स्टीफन यांच्या एकापाठी एक लॉटरी लागल्या. ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या एकापाठी एक 12 लॉटरी लागल्या.

नियम कठोर झाले तेव्हा लॉटरी फर्म उभारली

जेव्हा नियम कठोर झाले तेव्हा मंडेल यांनी एक लॉटरी फर्म उभारली. तेव्हा त्यांना समजलं की, अमेरिकेत असे कठोर नियम नाहीयेत. ते अमेरिकेत जाऊन लॉटरी खरेदी करू लागले. अनेक लोकांना सोबत घेऊन ते लॉटरी तिकीट खरेदी करत होते. ते जे नंबर सांगत होते त्यातील एकना एक नंबर येत होता. अशाप्रकारे एका मोठी लॉटरी त्यांच्या नावे होत होती.

अमेरिकेत लॉटरीतून त्यांनी 3 कोटी रूपये कमावले. व्हर्जिनियामध्ये सगळ्यात मोठा जॅकपॉट जिंकला. यादरम्यान त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप लागला आणि 20 महिने तुरूंगातही रहावं लागलं. पण ते थांबले नाहीत.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके