शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

औषधांच्या गोळ्यांच्या पॅकेटवरील लाल रंगाच्या रेषेचा अर्थ काय? जाणून घ्या अर्थ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 6:13 PM

तुम्ही कधी विचार केलाय का की, गोळ्यांच्या पॅकेटवर ही लाल रंगाची रेषा का असते? नसेल केला तर आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगतो.

लोक सामान्य डॉक्टरकडे गेले की, त्यांची चिठ्ठीवर लिहून दिलेली औषधं केमिस्टकडून विकत घेतात आणि त्यानंतर त्या औषधांचं सांगितलेल्या वेळेवर सेवन करतात. पण केमिस्टकडून घेतलेल्या औषधांचं पॅकेट कधी कुणी बघत नाहीत. त्यावरील कंटेट कुणी वाचत नाही. त्यावरील साइन्सचा अर्थ समजून घेत नाही. जर तुम्ही कधी नोटीस केलं असेल तर गोळ्यांच्या स्ट्रीपवर मागच्या बाजूला इतर माहितीसोबतच एक लाल रंगाची रेषाही असते. तुम्ही कधी विचार केलाय का की, गोळ्यांच्या पॅकेटवर ही लाल रंगाची रेषा का असते? नसेल केला तर आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगतो.

का असते ही लाल रेषा?

आरोग्य मंत्रालयानुसार, गोळ्यांच्या ज्या पॅकेटवर अशाप्रकारची लाल लाइन असते, ती औषधं तुम्ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये. केमिस्टना ही औषधं विकण्याची परवानगी केवळ तेव्हाच दिली जाते जेव्हा या औषधांसाठी एखाद्या डॉक्टरने तुम्हाला चिठ्ठी दिली असेल.

अ‍ॅंटीबायोटिक औषधांच्या दुरूपयोगावर लक्ष ठेवण्यासाठी औषधांच्या पॅकेटवर लाल रेषा दिली जाते. स्ट्रीपवर लाल रेषा देण्याचा उद्देश टीबी, मलेरिया, लघवीसंबंधी संक्रमण आणि इतकंच काय तर एचआयव्हीसहीत अनेक गंभीर आजारांसाठी डॉक्टरांच्या परवानगी शिवाय किंवा थेट केमिस्टकडून अ‍ॅंटीबायोटिकच्या खरेदी-विक्रीला रोखणं हा आहे. आरोग्य आणि परिवार मंत्रालयानुसार, अशाप्रकारची औषधं खासकरून अ‍ॅंटीबायोटिक्स ज्यांच्या पॅकेजिंगवर लाल रेषा असते, त्यांचा वापर एखाद्या योग्य डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कधीही करू नये. जागरूक रहा, सुरक्षित रहा.

काय आहे Rx चा अर्थ?

आता आपण बघुया की, काही औषधांच्या पॅकेटवर Rx असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं. जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशाप्रकारचं औषध घेतलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. 

काय आहे NRx चा अर्थ?

काही औषधांच्या पॅकेटवर NRx असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा होतो की, हे नशेचं औषध आहे आणि हे केवळ तेच विकू शकतात ज्यांच्याकडे याचं लायसन्स आहे.

XRx चा अर्थ?

काही औषधांच्या पॅकेटवर XRx असं लिहिलेलं असतं. हे एक असं औषध आहे जे केवळ डॉक्टर विकू शकतात आणि त्यांच्याकडे यांचं लायसन्स असावं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध मेडिकल स्टोरमधून खरेदी करू शकत नाही. भलेही तुमच्याकडे डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठीही असेल तरी.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके