कितीही अडचणी येवोत आपल्या कर्तव्यावर हजर असणारे आणि तितकेच तत्पर असणारे लोक तुम्ही पाहिले असतील आज आम्ही तुम्हाला अशाच एका आजोबांबद्दल सांगणार आहोत. या आजोबांना पॅरालिसिसचा आजार झाला आहे. त्यामुळे त्यांना उभं राहायलाही त्रास होतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. ६९ वर्षांच्या या आजोबांचे नाव एन एस राजप्पन आहे. केरळच्या कोट्याकम जिल्ह्यातील हे आजोबा रहिवासी आहेत.
इंग्रजी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एन एस राजप्पन हे गेल्या ६ वर्षांपासून नाल्यातून कचरा बाहेर काढण्याचे काम करत आहेत. त्यांच्या गुडघ्याच्या खालचा भाग पॅरेलाईज्ड आहे. त्यामुळे ते चालू शकत नाहीत. हाताला पकडून त्यांना त्यावं लागतं. अशाच अवस्थेत पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी रोज तलावातून कचरा काढतात. वेंबनाड आणि कुमारकोम या तलावातील कचरा साफ करतात.
अभिनेता रणबीर हुड्ड्डा याने या आजोबांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पर्यावरणाला स्वच्छ ठेवत असलेल्या या आजोबांचा व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचवला. देशाबद्दल आपलं प्रेम दाखवण्यासाठी हे आजोबा तलावाची साफसफाई करण्याचं काम अनेक वर्षांपासून करत आहेत. लोकांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसंच देशभक्तीचा खरा चेहरा असं ही या आजोबांना म्हटलं आहे.
द न्यूज मिनटने दिलेल्या माहितीनुसार राजप्पने हे तलाव साफ करण्यासाठी एक बोट भाड्याने घेतात. नंतर ती बोट चालवून तलावातील कचरा साफ करतात. त्यांनी सांगितले की,'' हे काम केल्यानंतर मला जास्त काही मिळत नाही. पूर्ण प्लास्टिकच्या बॉटल्सनी भरलेल्या बोटीत एक किलोपेक्षा कमी कचरा असतो. एक किलो प्लास्टिकसाठी मला १२ रुपये मिळतात. पण कोणीतरी या कामातही पुढकार घ्यायला हवा. मी माझ्या आयुष्यातील जास्तीत काळ हे काम करण्यात घालवला आहे. आता मला हे काम करण्यासाठी मोठी बोट हवी आहे जेणेकरून मी मला जास्तीत जास्त परिसर कव्हर करता येईल. ''
या आजोबांकडे स्वतःचे घर सुद्धा नाही. बाजूला त्यांची बहिण राहते ती त्यांना जेवण देते. दोनवर्षापूर्वी आलेल्या माहापूराने सारं काही उद्भवस्त केलं. तरिही हार न मानता पर्यावरण सेवेसाठी या आजोबांनी पुढाकार घेतला आहे.
त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास
कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण