सध्याच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर आपली शहरातील किंवा परदेशातील नोकरी सोडून आपल्या गावी परतलेले लोक खूप कमी असतात. लॉकडाऊनच्या काळात हाताला कोणंतही काम नसल्याने तसंच कंपनी बंद झाल्याने अनेकांना आपल्या गावी परतून रोजगाराचं नवीन साधन शोधावं लागलं. आज आम्ही तुम्हाला अशाच एक शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. पठाणकोटच्या गोसाईपूरचे रहिवासी असलेले सरदार अवतार सिंग गुळाचा व्यवसाय करतात.
सुरूवातीला ते मलेशियामध्ये नोकरी करत होते आणि आता उसाची शेती करत आहेत. त्याच्या शेतीतील उसापासून तयार होत असलेल्या गुळाला भारतातच नाही तर परदेशात सुद्धा मागणी आहे. अवतार सिंग मलेशियात ८ वर्षांपासून नोकरी करत होते. एकिकडे कुटूंबाला सोडून राहण्याची त्यांची इच्छा नव्हती. म्हणून ते गावी आले. त्यानंतर स्मार्ट शेतीचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी उसाची शेती करायला सुरूवात केली. गुळाच्या व्यवसायात त्यांना आपलं चांगलंच नाव कमावलं आहे.
संपूर्ण पंजाब शहरात यांचा व्यवसाय प्रसिद्ध आहे. दूर-दूर वरून लोक अवतार सिंग यांच्या शेतातील गुळ घेण्यासाठी येतात. दरम्यान पठाणकोट येथील जमीन ऊसाच्या शेतीसाठी खूप पोषक आहे. रोज दीड क्विंटल गुळ अवतार सिंग तयार करतात. सीजन आल्यानंतर त्यांची सुरूवातीलाच ४ लाख रुपयांपर्यंत कमाई होते.
लय भारी! बाप लेकीच्या नात्याची बातच न्यारी, मुलीचे पाय धुवून तेच दूध प्यायला, पाहा भावूक व्हिडीओ
अवतार सिंह यांनी उसाची शेती करण्यासाठी खास प्रशिक्षण घेतलं होतं. कृषी विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये त्यांनी हे प्रशिक्षण घेतलं. अवतार सिंह यांच्या गुराळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि इंग्लडमध्ये या गुळाला मागणी आहे. फिरायला जाणार अन् पुन्हा कधीच नाही येणार, ट्रम्प अशा पद्धतीने सोडू शकतात व्हाईट हाऊस...