जगभरात अनेक महिला आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असतात. या महिला अनेक समस्यांचा सामना करत खणखरपणे उभ्या असतात. अशाच एका महिलेची गेल्या अनेक वर्षांपासून फॅशन इंडस्ट्रीत चर्चा सुरू आहे. त्याला कारणही तसंच आहे. या महिलेला पुरूषांसारखी दाढी येते. त्यामुळेच ती नेहमी चर्चेत असते. एका रिसर्चनुसार, जगात 14 महिलांपैकी एकीचं शरीर पुरूषासारखं असतं. चला जाणून घेऊ या महिलेबाबत...
या तरूणीचं नाव आहे हरनाम कौर (Harnaam Kaur). सध्या ती ब्रिटनमध्ये राहते. दाढीमुळे तिचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर तर तिच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. तशी तर हरनाम एक यशस्वी सोशल मीडिया स्टार आणि मॉडल आहे. त्यासोबतच ती एक मोटिवेशनल स्पीकरही आहे. तिचे फोटो वेगवेगळ्या मॅगझिनच्या कव्हर पेजवर येत असतात. ती इतकी प्रसिद्ध आहे की, लोक तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आतुर असतात.
आज भलेही हरनाम कौर एक यशस्वी महिला आहे, तिचा फॅशन विश्वातील मोठं नाव आहे. पण एकेकाली दाढीमुळे ती फार वैतागली होती. लोक सुरूवातीला तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघत होते. तिला हिणवत होते. दाढीमुळे तिला सार्वजनिक ठिकाणांवर जाणंही अवघड होत होतं. पण आपल्या या कमजोरीला तिने तिची ताकद बनवलं.
हरनाम कौर जेव्हा 12 वर्षांची होती तेव्हा तिला पॉलिसिस्टीक ओवरी सिंड्रोम नावाचा एक आजार होता. त्यामुळे शरीरावरील केस इतर तरूणींच्या तुलनेत जास्त वाढू लागले होते. चेहऱ्यावर दाढी असल्या कारणाने तिला खूपकाही सहन करावं लागलं. शाळेत मुली तिची खिल्ली उडवत होत्या. त्यासोबतच शेजारी, नातेवाईक सगळेच हरनामची खिल्ली उडवत होते.
दाढी वाढणं रोखण्यासाठी हरनामने अनेक उपाय केले. अनेक क्रीम, औषधांचा वापर केला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी हरनामने दाढी कापणंच बंद केलं. तिने जे आहे ते स्वीकारलं. आज हरनाम एक फेमस सोशल मीडिया स्टार, मॉडल, मोटिवेशनल स्पीकर आहे. तिच्या पोस्ट व्हायरल होत असतात. अनेकांसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे. फॅशन विश्वास तिला मानाचं स्थान आहे.