या मुलाचं नाव आहे यशायाह अकोस्टा(Isaiah Acosta). त्याची कहाणी ऐकून तुमचाही जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. कारण यशायाह जेव्हा जन्माला आला त्याला तोंडच नव्हतं. अकोस्टा ३१ ऑक्टोबर १९९९ ला अमेरिकेच्या एरिझोनामध्ये जन्माला आला होता. तो वेळेच्या आधीच जन्माला आला होता. दोन महिने आधीच त्याचा जन्म झाला होता. जन्माला आल्यावर डॉक्टर तर असेही म्हणाले होते की, त्याची जगण्याची शक्यता कमी आहे. पण आज तो स्टार झाला आहे.
तो केवळ जगलाच नाही तर मोठा स्टारही झाला आहे. त्याने डॉक्टरची भविष्यवाणी खोटी ठरवली. पण त्याला जॉ लाइन म्हणजे जबडा नाहीये. या आजाराला अग्न्याशिया म्हटलं जातं. ही फार अवघड स्थिती असते. यात एका किंवा दोन्ही जबडे नसतात.
त्याला खालचे जबडे आणि श्वसनपथ नाही. त्यामुळे त्याला श्वास घेता येत नाही आणि खाताही येत नाही. तो त्याच्या गळ्यात लावलेल्या एक श्वासनलिकेच्या माध्यमातून श्वास घेतो. तसेच त्याच्या पोटात एक ट्यूब लावली आहे ज्याच्या माध्यमातून तो खातो.
यशायाहचं बालपण सोपं नव्हतं. तरी सुद्धा त्याचे आई-वडील नेहमी त्याच्या पाठीशी उभे होते. श्वास घेण्यासाठी तो ज्या ट्यूबचा वापर करतो. ती दिवसातून कमीत कमी तीन वेळा स्वच्छ करावी लागते. दर आठवड्याला ती बदलावी लागते. त्याच्या आई-वडिलांनी त्याला नॉर्मल स्कूलमध्येच पाठवलं. कारण तो ऐकू शकत होता. समजू शकत होता. त्याने पदवीही मिळवली आहे.
People च्या वृत्तानुसार, तो इतर मुलांपेक्षा वेगळा दिसत होता. अनेकदा यावरून लोकांनी त्याची खिल्लीही उडवली आहे. गेल्या २० वर्षात त्याच्यावर अनेक सर्जरी झाल्या. त्यामुळे तो जास्तीत जास्त हॉस्पिटलमध्ये राहिला आणि आपल्या जीवनाची लढाई लढत राहिला.
त्याच्यासमोर कृत्रिम जबडे लावण्याचा पर्याय होता. पण त्याने यासाठी नकार दिला. त्याला वाटतं की, याने केवळ त्याचा चेहरा ठीक होईल. त्याला आवाज मिळणार नाही. तो जसा दिसतो तसा तो आनंदी आहे. २०१६ मध्ये त्याने फीनिक्स चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलांच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्याने इथे लोकांना सांगितले की, त्याला एक रॅपर बनायचं आहे. बालपणापासूनच तो गाणी लिहितो.
२०१७ मध्ये तिचं पहिलं गाणं आलं. याचं टायटल 'ऑक्सीजन टू फ्लाय' होतं. यानंतर त्यानंतर 'हेट इज द वीक' हे गाणं लिहिलं. तो गाण्याच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतो. अमेरिकेतील या मुलाने हे दाखवून दिलं आहे की, तो हार मानणार नाहीये.