डॉक्टर देवाचं दुसरं रूप असतं, असं म्हटलं जातं. अनेकदा हे खरंसुद्धा असल्याचं दिसून येतं. ओडिसाच्या संबळपूर जिल्ह्यातील डॉक्टरांनी ही बाब सत्यात उतरवली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या व्यक्तीनं गरिब लोकांच्या उपचारांसाठी एक रूपया (‘One Rupee’ clinic) क्लिनिक सुरू केलं आहे. म्हणजे या दवाखान्यात एक रूपयात रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत.
वृत्तसंस्था एनएनआयनं दिलेल्या माहितीनुसार डॉ. शंकर रामचंदानी वीर सुरेंद्र साईं इंस्टी्ट्यूट ऑफ मेडिकल सायसेज एंड रिसर्चचे प्राध्यापक आहेत. त्यांनी बुरला कस्बे येथे एक हे क्लिनिक उघडलं आहे. या ठिकाणी रुग्णांना उपचार करण्यासाठी १ रूपया द्यावा लागतो.
३८ वर्षीय डॉ. रामचंदानी यांनी सांगितले की, मला अनेक वर्षांपासून गरिबांची सेवा करण्याची त्यांची इच्छा होती. मी एक सिनियर रेजीडेंटच्या रुपात (VIMSAR) सेवा देत होतो. सिनियर रेजीडेंट्सना प्रायव्हेट प्रॅक्टिसची परवानही नव्हती. गेल्या काही दिवसात एका सहाय्यक प्राध्यापकाच्या रुपानं मला काम पाहावं लागणार होतं.ड्युटी संपल्यानंतर मला प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्याची अनुमती मिळाली. त्यानंतर मी भाडयाच्या गाळ्यात क्लिनिक सुरू केले. '' काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक
रामचंदानी पुढे म्हणाले की, ''उपचारासाठी मी गरिब, गरजू लोकांकडून एक रूपया घेतो. कारण उपचार घेतले , मोफत सेवा घेतली पण काहीही पैसे दिले नाहीत. असं त्यांना वाटू नये म्हणून मी हा एक रूपया घेतो. देव तारी त्याला कोण मारी! मशिनमध्ये हात अडकून दोन भाग झाले; अन् डॉक्टरांनी केला असा चमत्कार
त्यांची पत्नीसुद्धा डॉक्टर आहे
रामचंदानी यांनी पत्नी सिखा रामचंदानीसुद्धा एक डेंटिस्ट आहेत. ज्यामध्ये त्या त्यांची मदत करत आहे. गेल्या शुक्रवारी या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी त्यांच्या दवाखान्यात ३३ रुग्ण आले. २०१९ ला रामचंदानी या एका कुष्टरोग्याला आपल्या कुशीत उचलून घरापर्यंत सोडले होते. या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.