प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीचं कुत्र्यावर प्रेम असतंच. यात काही नवीन नाही. पण कुत्र्यांशी संबंधित वेगवेगळ्या वस्तूंची आवड कुणाला असू शकते? म्हणजे बघा ना बॅगवर कुत्र्याचं चित्र, मगवर कुत्र्याचं चित्र, घरातील भींतींवर कुत्र्याचे फोटो, घरात कुत्र्यांच्या वेगवेगळ्या प्रतिमा. सगळीकडे फक्त आणि फक्त कुत्र्याशी संबंधित वस्तू. सीरियाची एक तरूणी आहे. Mary Elias असं तिचं नाव असून तिच्याकडे कुत्र्यांशी निगडीत इतक्या वस्तू आहेत की, तिच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड झालाय.
Elias कडे कुत्र्यांशी संबंधित १४९६ वस्तू आहेत. हे जगातलं सर्वात मोठं कलेक्शन आहे. कुत्र्यावर भरपूर प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडेही इतक्या वस्तू आढळणार नाहीत. यामुळे Elias चं नान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डममध्ये नोंदवण्यात आलं आहे.
Elias कडे दोन कुत्रे आहेत. सुरूवातीला तिचे मित्र-मैत्रिणी तिला कुत्र्यांसाठी वेगवेगळे गिफ्ट देत होते. त्यानंतर तिलाही कुत्र्यांशी संबंधित वस्तू खरेदी करण्याची एकप्रकारे सवयच लागली. इतकेच काय तर तिने कुत्र्यांचे दोन स्टॅच्यू सुद्धा खरेदी केलेत. या गोष्टीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेल्याने Elias आनंदी आहे.