(Image Credit : The Better India)
आज शेती करण्यात सर्वात मोठी अडचण दुष्काळ आणि कर्जामुळे येते. महाराष्ट्रातील एक गाव आहे धामणगाव. येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. स्थानिक नद्या कोरड्या पडल्या होत्या, पाऊस होत नव्हता. २०१६ ची घटना आहे. शेतकऱ्याने ४० एकर जमिनीतून काहीच पिकलं नसल्याने झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या केली होती. गेल्या दोन दशकांपासून ही समस्या या गावात आहे.
गावातील तरूण बनला जॉइंट कमिश्नर
जमिनीत पाण्यात कमतरता आणि दुष्काळ या समस्यामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य लोकही प्रभावित झाले. याचदरम्यान मुंबईतील इन्कम टॅक्स विभागाचे जॉइंट कमिश्नर डॉ. उज्ज्वल चव्हाण यांनी जेव्हा ही दुर्दशा पाहिली तर ते शॉक्ड झाले. ते याच गावातील आहेत. अशात त्यांनी आपल्या गावासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला.
द बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्यांनी या समस्येबाबत काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. आधी त्यांनी एक जल संरक्षण योजना लॉन्च केली. याने नद्या आणि भूजल स्थिती ठिक करण्याचं ठरवलं. नंतर छोटे बांध आणि जल संरक्षणासाठी खोदकाम केलं. या प्रयत्नातून २२ कोटी लीटर पाणी जमा होऊ शकतं. या परिसरातील पाण्याची समस्या दूर झाली.
इतरही गावात केला सुधार
हेच मॉडल त्यांनी इतर १६ गावांमध्ये लॉन्च केलं. ज्यामुळे अनेक गावे ३ वर्षांच्या आत दुष्काळातून बाहेर पडलीत. ते स्वत: एका शेतकरी कुटूंबातील आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत. आई शिक्षिका आहेत. शेतीच्या समस्या त्यांनी पाहिल्या आहेत. त्यांनी UPSC जमिनीत बदल करण्यासाठीच जॉइन केली होती.
डॉ. चव्हाण म्हणाले की, '३० वर्षांआधी कोणत्याही पोकलेन मशीनी नव्हता. त्यामुळे लोकांनी नुकसानाच्या सीमेची परवा न करता विहिरी मॅन्युअल पद्धतीने खोदण्यात आल्या. विहिरींची खोली ७० फूट झाली. त्यामुळे पाण्याची समस्या वाढली. शेतकरी आधी केवळ पावसाळ्यात शेती करत होते. वर्षभर दुसरं उत्पन्न नव्हतं. त्यामुळे लोक शहराकडे जाऊ लागले. गावात केवळ वयोवृद्ध राहिलेत. आर्थिक चक्र सीमित झालं. आमच्याकडे काहीच सेव्हिंग नव्हतं. त्यामुळे काही समजायच्या आत आम्ही एका चक्रव्यूहात अडकलो होतो'.
या कामात गावातील लोकांनीही त्यांची खूप मदत केली. काही एनजीओ समोर आल्यात. गावातील लोकांनी १ हजार रूपयांपासून आर्थिक मदत केली. ज्यांना जी जमेल ती मदत केली आणि आज गावातील पाण्याची समस्या दूर झाली. इथला शेतकरी सुखावला आहे. आज याचा फायदा ३० हजार शेतकऱ्यांना मिळत आहे.