लहान मुलं कधी कधी असं उदाहरण समोर ठेवून जातात जे पाहून मोठमोठ्या लोकांनाही स्वतःची लाज वाटते. असाच एक प्रकार समोर आला आहे. नितिन आणि नितिश या दोन्ही जुळ्या भावंडांनी एका ७० वर्षीय महिलेची मदत केली आहे. ही घटना तामिळनाडूच्या कोथामंगनमध्ये घडली. ७० वर्षीय शुभलक्ष्मी नावाच्या आजींकडून चाललंही जात नव्हतं. त्याचवेळी या जुळ्या मुलांनी आजींना पाहिलं आणि २५०० रूपयांची भेटवस्तू, ऊस आणि कपडे घेण्यासाठी सराकारी रेशनच्या दुकानात घेऊन गेले.
रिपोर्ट्नुसार या आजी रेशनच्या दुकानात जात होत्या. त्यांना चालताना खोकण्याचा त्रास होत होता. त्यांची मुलगीसुद्धा त्यांच्या सोबतच होती. त्यांच्या मुलीची मानसिक स्थिती बरी नव्हती. रस्त्यात मध्येच त्यांना इतकं थकल्याप्रमाणे वाटू लागलं की त्यांच्याकडून व्यवस्थित चाललं सुद्धा जात नव्हतं, म्हणून त्या रस्त्यावरच बसल्या. ७० वर्षीय आजींची अवस्था इतकी खराब झाली होती की त्यांना २ तासात अर्धा रस्ता चालणंही कठीण होतं. सॅलेड विकून महिन्याला लाखो कमवत आहे पुण्याची ही महिला, ३ हजारात सुरू केला होता बिझनेस....
या दोन जुळ्या मुलांनी आजींना पाहताच मदतीचा हात दिला. त्यांना एका हातगाडीवर बसवून रेशनच्या दुकान घेऊन गेले. त्यानंतर या आजींना परत घरीसुद्धा सोडलं. पोंगलदरम्यान राज्य सरकारनं २५०० रूपयांची रोख रक्कम, १ किलो साखर, १ किलो तांदूळ, १ साडी आणि धोतर नागरिकांना दिले. या सगळ्यात या चिमुरड्यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. बाबो! नवऱ्याला कुत्र्याचा पट्टा घालून बायको फिरवत होती; पोलिसांनी वसूल केले २ लाख