इतिहासकारांनुसार निजाम हे हैद्राबादमध्ये मुघलांच्या एजंटच्या रूपात आले होते. त्यांनी १७२२ मध्ये संधी मिळताच स्वत:ला हैद्राबाद संस्थानाचा राजा घोषित केलं होतं आणि आपलं वेगळं राज्य तयार केलं होतं. इतिहासात ७ निजाम झाले ज्यांनी हैद्राबादच्या गादीवर राज्य केलं. पण यातील एकच निजाम असा होता ज्याने वेस्टर्न म्हणजे इंग्रजांसारखे कपडे घालणे सुरू केले होते.
जगातील सर्वात मोठं Wardrobe
या निजामाचं नाव होतं महबूब अली खान. हा हैद्राबादच्या सहावा निजाम होता. त्याला कपडे घालण्याची फार आवड होती. पण त्याची खासियत ही होती की, तो एकदा जे कपडे घालायचा ते पुन्हा कधी वापरत नव्हता. ते कपडे तो फेकून द्यायचा. ज्याचा परिणाम असा झाला की, त्याच्या जगातलं सर्वात मोठं कपड्याचं कपाट तयार झालं. हे कपाट त्याच्या हवेलीच्या डाव्या बाजूला तयार करण्यात आली होती. या कपाटाची लांबी २४० फूट इतकी होती आणि यात कपड्यांशिवाय शूज आणि इतरही वस्तू ठेवल्या जात होत्या. (हे पण वाचा : रहस्य! ३६५ राण्यांपैकी एकीसोबत रात्र घालवायची असल्यास तिची निवड कशी करायचा हा राजा?)
जुने कपडे फेकून नवीन ठेवले जात होते
महबूब अली खानने हे कपडे ठेवण्यासाठी १२४ कपाटं विकत घेतली. त्यांच्याजवळ चेंजिंग रूम बनवल्या होत्या. त्यात नवे कपडे ठेवता यावे म्हणून जुने कपडे फेकून दिले जात होते. हैद्राबादच्या जुन्या हवेलीमध्ये आता केवळ एकच कपाट शिल्लक आहे. यात एक टोपी आणि दोन जोड शूज आहेत. या हवेलीला आता म्यूझिअम बनवण्यात आलं आहे. शूज पाहिल्यावर लक्षात येतं की, ते एकदाच वापरले असावेत. यावर लंडनच्या एका कंपनीचा लोगो दिसतो.
कपाटाला लिफ्टही होती
त्याचं जे वार्डरोब होतं त्यात एक लिफ्ट होती. ही लिफ्ट हाताने चालवली जायची. ही कपाटे तयार करण्यासाठी बर्माहून खास लाकूड मागवण्यात आलं होतं. याला कीड लागत नाही. हे वॉर्डरोब आजही तसंच आहे जसं आधी होतं. या कपाटाचा उल्लेख Legendotes Of Hyderabad मध्ये करण्यात आला आहे.