पाकिस्तानच्या एका पायलटनं उड्डाणादरम्यान एक युएफओ पाहिल्याचा दावा केला होता. पाकिस्तानच्या सरकारी विमान कंपनीच्या वैमानिकानं हा दावा केला होता. उड्डाणादरम्यान आपल्यालाला आकाशात एक चमकदार युएफओ दिसल्याचं त्यानं म्हटलं. लाहोरहून कराचीदरम्यानच्या उड्डाणात रहीम यार खान या वैमानिकाला युएफओ दिसल्याचं वृत्त जिओ न्यूजनं या वैमानिकाच्या हवाल्यानं दिलं होतं. या घटनेचा व्हिडीओदेखील आपण घेतला असल्याचा दावा त्या वैमानिकानं केला. हे वृत्त पसरताच सोशल मीडियावर मात्र त्याला आणि पाकिस्तानला ट्रोल करण्यास सुरूवात झाली.
एका यझुरनं तुम्हाला भीक मागण्यासाठी अॅल्युमिनिअमचा कटोरा दिसला असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली. तर काही जणांनी तुम्ही मजा उडवताय का असे मीम्स शेअर केले. तर एकानं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो शेअर करत युएफओसोबत हेच तर नव्हते ना असा सवालही केला.