प्रत्येक व्यक्ती जीवनात लग्नाला फार महत्व असतं. ही एक अशी बाब ज्यामुळे व्यक्ती पूर्ण आयुष्य बदलून जातं. लग्न हे एक पवित्र नातं मानलं जातं. त्यामुळे याचं महत्व अधिक वाढतं. वेगवेगळ्या भागांमध्ये लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा बघायला मिळतात. भारतात हिंदू धर्मानुसार एक लग्न करण्याची परवानगी असते. मात्र, असं असलं तरी भारतातील एक राज्य आहे जिथे पुरूष सहजपणे दुसरं लग्न करतात. म्हणजे जेव्हा व्यक्तीची पहिली पत्नी गर्भवती होते तेव्हा ती व्यक्ती लगेच दुसरं लग्न करते. यामागचं कारणही तसंच अवाक् करणारं आहे.
लग्नात पती-पत्नी सात जन्म एकमेकांची साथ देण्याचं वचन देत असतात. मात्र, इथे पती पत्नी गर्भवती झाल्या झाल्या दुसरं लग्न करून मोकळे होतात. तरीही या व्यक्तीची पहिली पत्नी आणि समाजातील लोक काहीच आक्षेप घेत नाहीत. याचं कारण म्हणजे पाणी. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, एक पुरूष केवळ पाण्यासाठी दुसरं लग्न कसं करू शकतो. तेच आज जाणून घेणार आहोत.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, पाणी हेच कारण आहे की,ज्यामुळे गर्भवती पत्नीही आनंदाने पतीचं दुसरं लग्न लावून देते. याचं कारण जे तुम्हाला अजब वाटू शकतं तेच आज आम्ही सांगणार आहोत.
हा अजब रिवाज राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात आहे. येथील देरासर गावात फार पूर्वीपासून ही अजब परंपरा पाळली जाते. जेव्हाही या गावात एखाद्या व्यक्तीची पत्नी गर्भवती होते, तेव्हा तिचा पती लगेच दुसरं लग्न करतो. त्याच्या या लग्नावर पत्नी, त्याचा परिवार किंवा गावातील कुणीही आक्षेप घेत नाहीत.
मुळात या भागात पाण्याची मोठी समस्या आहे. अशात महिलांना दूरदूर जाऊन पाणी आणावं लागतं. मात्र, जेव्हा महिला गर्भवती होतात तेव्हा महिला पायी चालत जाऊन पाणी आणू शकत नाहीत. अशात त्यांचे पती दुसरं लग्न करतात.
या भागात पाणी फार कमी आहे. पुरूष घरातील कामे करत नाही. अशात महिला पदर घेऊन पाणी आणण्यासाठी दूर जातात. पण महिलेच्या गर्भात बाळ असल्याने ती जाऊ शकत नाही. या स्थितीत जड काही काम करणं आणि लांब चालत जाणं अशक्य होतं. अशात महिलेचा पती दुसरं लग्न करतो, जेणेकरून घरात पाण्याची समस्या होऊ नये. गर्भवती पत्नी घरात आराम करते आणि दुसरी पत्नी पाणी आणायला जाते. या लग्नामुळे पहिल्या पत्नीलाही काही नाराजी नसते.