शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

आकाशातून शेतात पडला 'आगीचा गोळा', 18 महिने शोधला; हाती लागला कोट्यवधींचा खजिना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:35 PM

या दगडाचं (उल्का) वजन साधारणपणे 1 किलो एवढे आहे आणि किंमत अंदाजे 1 कोटी रुपये एवढी आहे...

आपण अनेकवेळा आकाशातून पृथ्वीवर उल्का पडल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. यातील काही उल्का समुद्रात पडतात तर काही एखाद्या निर्जन भागात पडतात. खरे तर एखाद्याला उल्कापिंडाचे तुकडे सापडणे अत्यंत दूर्मिळ. या खगोलीय दगडांची किंमत कधी-कधी तर कोट्यवधीतही असू शकते. असाच एक खगोलीय दगड सापडल्याने एका ब्रिटिश शेतकऱ्याचे पार आयुष्यच बदलले आहे. हा शेतकरी तब्बल 18 महिन्यांपासून त्याच्या शेतात पडलेल्या या दगडाचा शोध घेत होता. या दगडाचं (उल्का) वजन साधारणपणे 1 किलो एवढे आहे आणि किंमत अंदाजे 1 कोटी रुपये एवढी आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, नॉर्थ वेल्सच्या रेक्सहॅम येथे राहणाऱ्या 38 वर्षीय टोनी व्हिल्डिंग यांच्या घरावरून एक जळता गोळा गेला आणि तो शेतात गायब झाला. यानंतर टोनी यांनी शोध मोहीम सुरू केली. त्यांची ही मोहीम तब्बल 18 महिने सुरू होती. आता ते सापडलेला हा गोळा सर्टिफाइड करण्याच्या कामात लागले आहे. यानंतरच याची नेमकी किंमत कळू शकेल. यासंदर्भात बोलताना टोनी यांनी सांगितले, की जेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास आपण घराच्या मागे गार्डनमध्ये सिगारेट घेत होतो, तेव्हा सर्वप्रथम हा गोळा पाहिला. 

टोनी म्हणाले, ज्यावेळी हा गोळा जमिनीच्या दिशेने येत होता, त्यावेळी मला आकाशात काही तरी चमकत असल्यासारखे वाटले. मी वर पाहिले, तर मला एक आगीचा गोळा अगदी कमी उंचावरून जमिनीच्या दिशेने येताना दिसत होता. यामागे धूरही दिसत होता. हा गोळा एवढा जवळ होता, की मी हवेत फुटबॉलला किक केले असते, तरी तो कदाचित त्याच्यापर्यंत पोहोचला असता. पण हा गोळा जमिनीवर पडल्यानंतर काही सेकंदातच विझला आणि गायब झाला. यानंतर केवळ धूरच दिसत होता.

2014 मध्ये पृथ्वीवर पडली होती सूर्यमालेबाहेरील उल्का -याच पद्धतीने 2014 मध्येही एक उल्का पृथ्वीवर पडली होती. ही उल्का सूर्यमालेच्या बाहेरील होती. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे अमेरिकन लष्कराने यासंदर्भात माहिती दिली होती. या उल्केचे नाव CNEOS 2014-01-08 असे होते. जानेवारी 2014 मध्ये पापुआ न्यू गिनीच्या किनाऱ्यावर ही उल्का पडली होती. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEnglandइंग्लंडFarmerशेतकरी