अर्थातच देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पर्सनल लाइफबाबत, ते कसे राहतात, कसे जगतात, काय खातात हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये असते. मुकेश अंबानी तर नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांचं घर नेहमीच चर्चेत असतं. पण त्यांच्या घरातील बारीक सारिक गोष्टी अजूनही लोकांना फार जास्त माहीत नाहीत. त्यापैकीच एक बाब म्हणजे मुकेश अंबानी यांच्या घरी दूध कोणत्या डेअरीतून येतं आणि त्याची किंमत किती असते.
तर मुकेश अंबानी यांच्या घरी पुण्यातील देवेंद्र शहा यांच्या भाग्यलक्ष्मी डेअरीतून दूध येतं. पुण्यातून ३ तासात दूध मुंबईत येतं. अनेकांच्या घरी हे दूध सप्लाय केलं जातं. शहा यांच्या डेअरही व्हॅन रोज सकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत लोकांच्या घरोघरी दूध सप्लाय करते. महत्वाची बाब म्हणजे या डेअरीच्या ग्राहकांसाठी एक खास लॉगीन आयडी दिलेला असतो. त्याद्वारे ते ऑर्डर कॅन्सर करू शकतात, बदलू शकतात आणि वेगळ्या पत्त्यावरही मागवू शकतात.
देवेंद्र शहा यांच्या या डेअरीचं नाव आहे भाग्यलक्ष्मी डेअरी. या डेअरीची खासियत म्हणजे इथे गायींची विशेष काळजी घेतली जाते स्वच्छतेवरही अधिक भर दिला जातो. गायींसाठी इथे रबर मॅट आहेत. जे दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ केले जातात. इतकंच नाही तर येतील गायींना पिण्यासाठी आरओचं पाणी मिळतं. तसेच त्यांना चारा म्हणून सोयाबीन, अल्फा गवत हंगामी भाज्या आणि मक्याचा चारा दिला जातो. तसेच या डेअरीमध्ये २४ तास हळूवार आवाजात म्युझिक सुरू असतं.
या डेअरीच्या अनेक खाक बाबी आहेत. त्यातील आणखी एक म्हणजे इथे २ हजार डच होल्स्टीन प्रजातीच्या गायी आहेत. ही डेअरी २६ एकरात बनली असून येथून रोज २५ हजार लीटर दुधाचं उप्तादन होतं. इथे रोज सकाळी २ हजार गायींचं दूध काढलं जातं. इथे जवळपास सगळी कामे म्हणजे गायीचं दूध काढण्यापासून ते दुधाचे पॅकिंगपर्यंत मशीन करतात.
महत्वाची बाब म्हणजे या डेअऱीचे केवळ मुंबई-पुणे शहरात १६ ते १८ हजार इतके ग्राहक आहेत. ज्यात मुकेश अंबानी यांच्यासह अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांचाही समावेश आहे. ते हे दूध १५० रूपये लीटर या भावाने घेतात. भाग्यलक्ष्मी डेअरी प्रोजेक्टमध्ये शहा यांनी १५० कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. आता ते याला वाढवण्याचा विचार करत आहेत.