अनेकवेळा घरात फोन आणि विजेचं बिल थोडं जास्त आलं तर आपण खर्चावर नियंत्रण ठेवू लागतो. आपलं बजेट बिघडू नये यासाठी प्रयत्न करतो. पण अमेरिकेतील फ्लोरिडा येथील सेलिना या महिलेने फोनचं बिल पाहिल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिला कोट्यवधी रुपयांचं बिल आलं आहे.
सेलिनाला $201,000 म्हणजे 1.65 कोटी रुपयांचं फोनचं बिल आलं आहे. सेलिनाचं फोनचं बिल तिच्या दोन भावांसह एकत्रित आहे. तिचे भाऊ दिव्यांग होते आणि ते मेसेज आणि डेटा कम्युनिकेशनवर अवलंबून होते. पण असं असूनही, त्यांच्या फोनचे बिल सहसा जास्तीत जास्त £130 म्हणजेच 13,715.14 रुपये येतं. अशा स्थितीत सेलिनाला बिल चुकलं असल्याची खात्री होती.
"फोन बिल बरोबर आहे"
बिल दुरुस्त करण्यासाठी सेलिनाने तिच्या सेवा पुरवठादार टी-मोबाइलला कॉल केला. दुसरीकडे टी-मोबाइलने हे बिल योग्य असल्याचा युक्तिवाद केला. तिचं बिल $200,000 (रु. 1.62 कोटी) पेक्षा जास्त होतं, T-Mobile ने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आहे.
जेव्हा मियामी टीव्ही स्टेशन WSVN-TV ने तिच्या वतीने हस्तक्षेप केला तेव्हा सेलिनाला दिलासा मिळाला. त्यानंतर फोन कंपनीने बिल $2,500 (रु. 2.05 लाख) पर्यंत कमी करून ते भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचे मान्य केले.
एवढं मोठं बिल कसं आलं?
खरं तर, सेलिनाचे दोन्ही भाऊ जेव्हा एका आठवड्यासाठी अमेरिकेतून कॅनडाला आले, तेव्हा त्यांच्याकडून परदेशी सेवा आणि त्यांनी वापरलेल्या प्रचंड डेटासाठी शुल्क आकारले गेले. डेली स्टारच्या वृत्तानुसार, महिलेने परदेशी वापराबाबत अटी आणि निर्बंध वाचले नव्हते.
2,000 पेक्षा जास्त मेसेज आणि व्हिडीओ डाउनलोड
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या भावांनी 2,000 हून अधिक मजकूर पाठवले होते आणि व्हिडीओ डाउनलोड केले होते. ज्यासाठी तिला एकट्या डेटा शुल्कात £15,000 (रु. 15.83 लाख) खर्च आला. फोनचे बिल आल्यावर सेलिनाला धक्काच बसला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.