बघा म्हणजे आता लोकांसोबतच माकडांनाही ऑनलाईन शॉपिंगचं वेड लागलंय असंच म्हणावं लागेल. माकडांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं कुतूहल असतं. त्यांना वस्तू बघणे, त्यांचा वापर करणे फार आवडतं. याच सवयीमुळे एका माकडाने चीनमध्ये एक कारनामा केलाय. याने तुमच्या चेहऱ्यावर हसूही येईल आणि यातून शिकता सुद्धा येईल.
चीनच्या चांगझूमधे एक प्राणी संग्रहालय आहे यानचेंग वाइल्ड अॅनिमल वर्ल्ड. इथे एलवी मेंगमां काम करते. ती ऑफिसमध्ये बसून मोबाइवरून शॉपिंग करणार होती. दरम्यान तिच्या लक्षात आलं की, एका माकडाला जेवण द्यायचं राहिलं. ती फोन तिथेच ठेवून जेवण आणायला गेली. पण ती परत येईपर्यंत माकडाने आपला काम दाखवलं होतं.
मेंगमांने परत आल्यावर फोन चेक केला आणि तिला दिसलं की, काही नोटिफिकेशन आले आहेत. तिने निरखून पाहिल्यावर तिला Order Placed असा मेसेज दिसला. आता तिच्या हे लक्षात येत नव्हतं की, तिने काही खरेदीच केलं नाही तरी ऑर्डर कशी प्लेस झाली. ती विचारात पडली की, ऑर्डर स्वत:हून कशी प्लेस झाली.
नंतर तिने सीसीटीव्ही फुटेज चेक आणि जे पाहिलं त्याने ती हैराण झाली. सीसीटीव्ही फुटेजमधे तिला एक लहान माकड दिसलं. तिला दिसलं की, ती बाहेर गेली तेव्हा त्याने तिचा फोन घेतला. आता त्यात उत्सुकतेने बघत त्याच्याकडून शॉपिंग अॅपमधून वस्तूंची ऑर्डर प्लेस झाली. नंतर तो तेथून पळाला.
माकडाकडून हे चुकून झालं असलं तरी मेंगमांने ऑर्डर कॅन्सल केलं नाही. कारण या वस्तू मेंगमांने सिलेक्ट करून कार्टमधे ठेवल्या होत्या. तिला या वस्तूंची गरज होती.