शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कुठे माकडं तर कुठे डॉक्टर्स सर्व्ह करतात जेवणं; 'ही' आहेत जगातील हटके हॉटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 3:06 PM

विकेंडच्या दिवशी किंवा सुट्टी असल्यावर अनेक लोक बाहेर खाणं पसंत करतात. मग शोध सुरू होतो, तो उत्तम जेवण मिळणाऱ्या आणि चविष्ट जेवणाची मेजवाणी असणाऱ्या हॉटेल्सचा. पण तुम्हाला माहीत आहे का? जगभरामध्ये असेही काही रेस्टॉरंट्स आहेत. जे चविष्ट जेणाच्या मेजावणीसोबतच आपल्या हटके अंदाजासाठीही ओळखले जातात.

विकेंडच्या दिवशी किंवा सुट्टी असल्यावर अनेक लोक बाहेर खाणं पसंत करतात. मग शोध सुरू होतो, तो उत्तम जेवण मिळणाऱ्या आणि चविष्ट जेवणाची मेजवाणी असणाऱ्या हॉटेल्सचा. पण तुम्हाला माहीत आहे का? जगभरामध्ये असेही काही रेस्टॉरंट्स आहेत. जे चविष्ट जेणाच्या मेजावणीसोबतच आपल्या हटके अंदाजासाठीही ओळखले जातात. आज आम्ही तुम्हाला काही खास रेस्टॉरंट्सबाबत सांगणार आहोत. चला तर मग नक्की या रेस्टॉरंट्समध्ये काय हटके आहे ते जाणून घेऊया... 

'डिनर-इन-द-स्काय' रेस्टॉरंट

बेल्जियममध्ये असलेलं 'डिनर-इन-द-स्काय' रेस्टॉरंट जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. 150 फूट उंचावर असलेलं हे रेस्टॉरंट एकाचवेळी 22 लोकांना जेवणं सर्व्ह करतं. क्रेनच्या मदतीने हे रेस्टॉरंट हवेमध्ये तरंगत ठेवलं जातं. सेफ्टी अॅन्ड सिक्युरिटी लक्षात घेऊन येथे येणाऱ्या लोकांचं मनोरंजन करण्यात येतं.  जर तुम्हालाही हवेमध्ये तरंगणाऱ्या हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा तरी वेल्जियम डिनर-इन-द-स्काय रेस्टॉरंटचा आनंद घेऊ शकता. 

ट्विन रेस्टॉरंट; रशिया 

आता जाणून घेऊया रशियातील ट्विन रेस्टॉरंटबाबत. जिथे पाय ठेवताच तुम्हाला एकाच चेहऱ्याच्या दोन व्यक्ती दिसतात. या रेस्टॉरंटमध्ये फक्त जुळ्या लोकांनाच नोकरी देण्यात येते. मॅनेजरपासून वेटरपर्यंत या रेस्टॉरंटमध्ये सर्व स्टाफ ट्विन्स आहेत. 

जपान कायाबुकिया रेस्टॉरंट 

जपानमधील हे रेस्टॉरंट खाण्याऐवजी तेथील वेटर्समुळे जास्त प्रसिद्ध आहे. या हॉटेलच्या मालकांचं मत आहे की, माकडं माणसांपेक्षा जास्त इमानदार आणि योग्य पद्धतीने काम करतात. त्यामुळे येथे माकडांना लहानपणापासूनच वेटर्सच्या कामासाठी तयार केलं जातं. हे हॉटेल जगभरात मंकी रेस्टॉरंट म्हणून प्रसिद्ध आहे. 

प्रिसन रेस्टोरंट, इटली

मराठीमध्ये प्रिसन म्हणजे कैदी. इटलीमध्ये असं एकमेव रेस्टॉरंट आहे जे एका जेलमध्ये तयार करण्यात आलं आहे. येथे जेलमध्ये बऱ्याच दिवसांपासून कैद असणाऱ्या लोकांसाठी जेवण तयार करतात. खासकरून असे कैदी ज्यांना जेवण बनवण्याची आवड असते. ते हे रेस्टॉरंट चालवतात. जेलमध्ये जाऊन जर तुम्ही स्वादिष्ट पदार्थांची मेजवणी अनुभवायची असेल तर एकदा तरी या रेस्टॉरंट्समध्ये नक्की जा. 

न्यूयोर्कमधील निंजा रेस्टॉरंट 

निंजा म्हणजेच मार्शल आर्ट प्लेयर्स. न्यूयॉर्कमध्ये असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये तुमच्या स्वागतासाठी निंजा असतात. येथे जाण्यासाठी तुम्हाला जमिनीखाली असलेल्या एका गुहेमधून जावं लागतं. येथील वेटर्सही निंजा असतात. हे निंजा ग्राहकांना वेगवेगळ्या ट्रिक्सचा वापर करून जेवण सर्व्ह करतात. 

हार्ट अटॅक ग्रिल रेस्टॉरंट; लास वेगास 

लास वेगासमध्ये असलेलं हे रेस्टॉरंट आपल्या विचित्र मेन्यूसाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. हे एक बर्गर रेस्टॉरंट असून येथे वेगवेगळ्या साइजमधील आणि तुमच्या विचारापेक्षाही मोठे बर्गर मिळतात. या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलचा फिल येइल कारण येथील सर्व स्टाफ हॉस्पिटल्सच्या कपड्यांमध्ये सर्विस प्रोव्हाइड करतात. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सViral Photosव्हायरल फोटोज्tourismपर्यटन