(प्रातिनिधिक छायाचित्र)
सोशल मीडिया एकीकडे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं शानदार माध्यम म्हणून यशस्वी झालाय. पण या प्लॅटफॉर्ममुळे घरातीलच लोकांचे वाद वाढत असल्याचेही बघायला मिळतं. अशीच एक घटना ब्राझीलमधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर १४ गोळ्या झाडून तिची हत्या केली. याचं कारण म्हणजे पत्नी फेरेरा सोशल मीडियावर बोल्ड फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत होती.
३५ वर्षीय एलेन फेरेरा सियोलीन सोशल मीडियावर अॅक्टिव आहे आणि ती एक सोशल इंफ्लूएन्सरही आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ टिकटॉक-इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत होती. पण तिचा पती एलेजांद्रो एग्युलेरा याला पत्नीचा हा अंदाज अजिबात आवडत नव्हता.
रिपोर्ट्सनुसार, एंटोनियोचा फरेरासोबत एका टिकटॉक व्हिडीओवरून चांगलाच वाद झाला होता. यानंतर रागाच्या भरात एंटोनियोने फेरेरावर १४ गोळ्या झाडल्या. त्यानंतर एंटोनियोने स्वत:च्या डोक्यावर गोळी झाडत आत्महत्या केली. हा संपूर्ण प्रकार घडत असताना तिथे त्यांची सहा वर्षांची मुलगीही होती.
या कपलचे मृतदेह ब्राझीलच्या पोंता पोरा म्युनिसिपालिटी शेजारील एका प्रॉपर्टीमध्ये आढळून आलेत. फेरेराच्या शरीरावर कमीत कमी १४ गोळ्यांच्या जखमा दिसल्या. तिचा डावा हातली मोडलेला होता. तेच फेरेराच्या ४१ वर्षीय पतीच्या डोक्यात एक गोळी होती. या कपलच्या मुलीचा सांभाळ त्यांचे नातेवाईक करत आहेत.
पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले की, या कपल्या जवळच्या मित्रांनी सांगितले होते की, ते दोघे खूप भांडण करायचे आणि पब्लिकमध्येही दोघांमध्ये तणाव दिसत होता. फेरेराचे टिकटॉकवर ५८ हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच बोल्ड आउटफिटमध्ये आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होती. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहे.