कधी-कधी डॉक्टरांसमोर काही अशा केसेस येतात की, डॉक्टरही हैराण होतात. नेहमीच आताही चीनमधील एका व्यक्तीसोबत झालेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे राहणाऱ्या ४६ वर्षीय झू जॉन्गफाला नेहमीच डोक्यात झटके येत होते. जेव्हा त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आलं तेव्हा त्याचा एमआरआय केला. आणि त्यानंतर त्याचा रिपोर्ट पाहून डॉक्टरचीही बोलती बंद झाली.
झू च्या शरीरात ७०० पेक्षा जास्त टेपवर्म आढळून आले. हे टेपवर्म त्याच्या मेंदू आणि लिव्हरपर्यंत पोहोचले होते. रिपोर्टनुसार, टेपवर्मची अंडी आधी पोटावर्यंत पोहोचली आणि त्यानंतर रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात पसरले. डॉक्टरांनी सांगितले की, हे टेपवर्म अर्धवट शिजलेल्या डुकराच्या मांसाच्या माध्यमातून झू च्या शरीरात शिरले होते आणि नंतर त्यांची संख्या सतत वाढत राहिली.
डॉक्टरांनुसार, झू टीनिएसिस नावाच्या आजाराने पीडित होतो. हा आजार टेपवर्म टीनिया सोलियमच्या संक्रमणामुळे होतो. झू ने सांगितले की, त्याने एक महिन्याआधी डुकराचं मांस खाल्लं होतं. मात्र, ते मांस पूर्णपणे शिजलेलं होतं की नाही हे त्याला माहीत नव्हतं. झू हा एक मजूर आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, या आजाराने पीडित व्यक्तीला असह्य डोकेदुखी, डोळ्यांसमोर अंधारी येणे, झटके येणे आणि विसरण्याची समस्या होऊ शकते. अनेकदा या आजाराची लक्षणे संक्रमण झाल्यावर काही आठवड्यानेच बघायला मिळतात.
(प्रातिनिधीक फोटो) (Image Credit : Yahoo)
झेझियांग युनिव्हर्सिटी स्कूल ऑप मेडिसिनमधील डॉक्टर हुआंग जियानरॉन्ग यांच्यानुसार, झू ला अॅंटी-पॅरासिटीक औषधे देऊन त्याच्या शरीरातून टेपवर्म नष्ट केले गेले. सध्या यांचा प्रभाव त्याच्या शरीरावरून कमी होण्यासाठी उपचार सुरू आहेत.