दुबईमध्ये पोलिसांनी काही महिलांना अटक केली आहे. कारण या महिला बाल्कनीमध्ये उभ्या राहून न्यूज पोज देत होत्या. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी या महिलांना पब्लिकमध्ये गैरवर्तणूनक केल्याप्रकरणी अटक केली आहे. या महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
डझनभरापेक्षा अधिक महिला एका शूटसाठी न्यूड पोज देताना दिसत आहेत. दुबईतील एका पॉश परिसरात बाल्कनीमध्ये उभ्या या महिला एका प्रोफेशनल फोटोग्राफरला पोज देत आहेत. एका दुसऱ्या व्यक्तीने दुसऱ्या बाल्कनीतून या महिलांचे फोटो काढून व्हायरल केले. सौदी अरबमधील वृत्तपत्र द नॅशनलच्या रिपोर्टनुसार, हा एक पब्लिसिटी स्टंट असू शकतो. रिपोर्टनुसार, या महिलांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली जाऊ शकते आणि त्यांना एक हजार पाउंडचा दंडही भरावा लागू शकतो.
सौदी अरबमध्ये कायदे फारच कठोर आहेत आणि या देशात पब्लिकमध्ये किस करणे किंवा विना लायसन्स दारू पिणे यासाठी शिक्षा होते. सौदी अरबच्या अनेक भागात शरीया कायदा चालतो आणि या देशात पॉर्नवरही दंड भरावा लागू शकतो. किंवा तुरूंगावासाची शिक्षाही होऊ शकते.
या देशात सोशल मीडियाबाबतही कायदे फार कठोर आहेत. लोकांना त्यांच्या कमेंट आणि व्हिडीओसाठी तुरूंगात जावं लागू शकतं. इंग्लंडच्या ५५ वर्षीय एक महिलेला यासाठी तुरूंगात जावं लागलं होतं कारण तिने तिच्या दुबई बेस्ड पतीला मूर्ख म्हटलं होतं. त्यासोबतच अमेरिकेतील फिटनेस प्रोफेशनल जॉर्डन ब्रेनपॉर्डला ६० हजार पाउंडचा दंड लावला होता. कारण तिने इन्स्टाग्रामवर तिच्या एक्स वाइफला ''बिच' म्हटलं होतं.