Chinese police found criminal from mosquito : तुम्ही सिनेमात किंवा मालिकांमध्ये नेहमीच पाहिलं असेल की, एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस किती मेहनत घेतात. वेगवेगळ्या पुरावे गोळा करत ते खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचतात. अनेकदा तर तपासादरम्यान इतक्या छोट्या छोट्या गोष्टी गोळा केल्या जातात ज्यातूनही गुन्हेगारापर्यंत पोहोचलं जातं. चीनमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका गुन्हेगारापर्यंत पोलिसांना एका डासाने पोहोचवलं.
एका डासामुळे पोलिसांना एका गुन्हेगाराला अटक केली. चीनची न्यूज वेबसाइट ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनच्या फूजियान प्रांतातील फूजो शहरात एक हैराण करणारी घटना समोर आली. इथे एका गुन्हेगारापर्यंत पोलीस डासाच्या मदतीने पोहोचले. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, असं कसं होऊ शकतं? तर चला जाणून घेऊ..
येथील एका रहिवाशी भागातील अपार्टमेंटमध्ये चोरी झाली होती. या चोरीचा पोलीस तपास करत होते. घर बऱ्याच दिवसांपासून बंद होतं. त्यामुळे पोलिसांनी अंदाज लावला की, चोरी बाल्कनीतूनच घरात शिरला असणार. घराच्या किचनमध्ये काही अंडी, शिल्लक राहिलेले नूडल्स, बेडवर चादर आणि उशी सापडली. पोलिसांच्या लक्षात आलं की, चोराने घरात काही वेळ घालवला आणि त्यानंतर चोरी केली. जेव्हा तपास केला जात होता तेव्हा पोलिसांनी भींतीवर एका मेलेला डास चिकटलेला दिसला. त्याच्या शरीरातून रक्त निघालं होतं जे भींतीवर होतं.
ऑडिटी सेंट्रल वेबसाइटनुसार, पोलिसांनी या रक्ताची डीएनए टेस्ट करण्याचा प्लान केला. चौकशीतून समोर आलं की, तो डीएनए एका चाय नावाच्या गुन्हेगारासोबत मॅच झाला. या चोराचा बराच जुना क्रिमिनल रेकॉर्ड होता. 19 दिवसांनी त्याचा चौकशीसाठी बोलवण्यात आलं आणि तेव्हा त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. त्याने त्या घरासोबतच आणखी 3 घरांमध्ये चोरी केली होती. त्याला ताब्यात घेण्यात आलं.