अनेकजण मोठ्या आवडीने मशरूम खातात. मशरूम एकप्रकारचं फंगस असून पावसाळ्यात सडलेल्या कार्बनिक पदार्थावर हे आपोआप उगवतं. आता तर देश-विदेशात मशरूमची शेती केली जाते. तसे तर खाल्ले जाणारे मशरूम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चने एका अशा विषारी आणि घातक मशरूमच्या प्रजातीचा शोध लावलाय, जी खाणं तर सोडाल केवळ स्पर्श केल्यानेही आजारी पडला.
लाल रंगाचं हे मशरूम ऑस्ट्रेलियात आढळतं. याआधी तज्ज्ञांचं मत होतं की, हे मशरूम जपान आणि कोरियासारख्या आशियाई देशात उगवते. पण काही दिवसांपूर्वीच हे मशरूम क्वींसलॅंडमध्येही बघण्यात आलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या विषारी मशरूममुळे जपानमध्ये आणि दक्षिण कोरियात अनेक लोकांना मृत्यू झाला. लोकांनी हे मशरूम पारंपारिक चिकित्सेत वापरलं जाणारं मशरूम समजून चहात टाकून सेवन केलं. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.
संशोधकांनुसार, हे मशरूम इतकं विषारी आहे की, हे खाल्ल्याने ऑर्गन फेल होतात. म्हणजे मनुष्याचे अवयव काम करणं बंद करतात किंवा यामुळे तुम्हाला ब्रेन डॅमेजही होऊ शकतं. इतकेच काय तर याला हात जरी लावला तरी शरीरात सूज येऊ शकते. जेम्स कुक विश्वविद्यालयातील संशोधकांनुसार, हे एक असं मशरूम आहे, ज्याचं विष त्वचेतून शोषलं जातं.
पोडोस्ट्रोमा कॉर्नू-डामा नावाचं हे मशरूम सर्वातआधी चीनमध्ये १८९५ मध्ये आढळलं होतं. ताज्या रिपोर्टनुसार, हे मशरूम इंडोनेशिया आणि न्यू पापुआ गिनीमध्येही आढळलं.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, डॉक्टर बॅरेट यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलियात मशरूम जास्त पसंत केलं जात नाही. हेच कारण आहे की, आतापर्यंत हे मशरूम विषारी असल्याचं समोर आलं नाही. एका रिपोर्टनुसार, सहा महिन्याआधी ऑस्ट्रेलियामध्ये २० पेक्षा अधिक मशरूमच्या प्रजातींचा शोध लावण्यात आल. ज्यांची अजून कुणाला माहिती नाही.