Most expensive blood : जगात वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत. ज्यांबाबत लोकांना कमी माहिती असते. मात्र, हे जीव फारच अनोखे आणि कामाचे असतात. अनेकदा तर या जीवांमुळे मनुष्यांचा जीव वाचतो. एक असाच जीव आहे ज्याचं रक्त जगात सगळ्यात महाग आहे. याच्या १ लीटर रक्ताची किंमत इतकी असते की, तेवढ्यात तुम्ही एखादी कार खरेदी करू शकाल. या जीवाचं रक्त इतकं महाग का असतं आणि कोणत्या कामात येतं तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
नचरल हिस्ट्री म्यूजियम आणि मेरीलॅंड वेबसाईटनुसार, हॉर्स शू क्रॅब 45 कोटी वर्ष जुना जीव आहे. खेकड्यांची ही प्रजाती डायनासॉरपेक्षाही जुनी मानली जाते. महत्वाची बाब म्हणजे या खेकड्यांच्या रक्ताचा रंग निळा असतो. हा निळा रंग हीमोसायनिनमुळे असतो, जे रक्तात आधीच असतं.
या खेकड्यांच्या रक्ताला निळं सोनंही म्हटलं जातं. स्टडी डॉट कॉम वेबसाईटनुसार या खेकड्यांच्या एक लीटर रक्ताची किंमत १५ हजार डॉलर म्हणजे साधारण १२ लाख रूपयांपर्यंत असते. इतक्या पैशात एक कार आरामात येईल.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या निळ्या रक्ताला इतकी किंमत का? तर या रक्ताचा वापर वेगवेगळी औषध तयार करण्यात केला जातो. या जीवाच्या रक्तात एक प्रोटीन असतं ज्याला लिमुलस अमीबोसाइड लायसेट म्हटलं जातं. याचा वापर औषध आणि चिकित्सा उपकरण निर्माते वेगवेगळ्या टेस्टसाठी करतात.
वेगवेगळ्या औषध निर्मात्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांमध्ये एंडोटॉक्सिन पदार्थांच्या प्रमाणाचं परीक्षण करण्यासाठी या रक्ताचा वापर करतात. हे बॅक्टेरिअल तत्व मनुष्यांमध्ये ताप आणू शकतं आणि मनुष्यांसाठी ते घातक ठरू शकतं. एका वेबसाईटनुसार, ही जीव अमेरिकेत अटलांटिक ओशनच्या तटावर मिळतात. या जीवांच्या ब्लीडिंग प्रोसेसनंतर १० ते ३० टक्के खेकडे जिवंत राहत नाहीत.