Lapis Lazuli colour : रंगांचा उत्सव होळीचा रंग अजूनही उतरला नाहीये. आजही अनेक भागांमध्ये होळीचे रंग उधळले जात आहेत. लाल, हिरवा, निळा, पिवळा, केशरी अशा एक ना अनेक रंगांचा आनंद घेतला जात आहे. हे रंग स्वस्तात बाजारात मिळतात. पण एक रंग असा आहे जो खरेदी करणं सामान्य लोकांना जमणारं नसतं. याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त असते. हा रंग फार दुर्मिळ आहे जो केवळ श्रीमंत लोक खरेदी करू शकतात. चला जाणून घेऊ या खास रंगाबाबत....
हिऱ्यांची त्यांच्या कॅरेटवरून आणि रंगांवरून किंमत ठरते. पण आज आम्ही तुम्हाला एका जगातल्या सगळ्यात महागड्या रंगाबाबत सांगणार आहोत. या रंगाला लापीस लाजुली असं म्हणतात. colormatters नुसार, हा सुंदर निळा रंग कधीकाळी इतका दुर्मिळ होता की, याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त होती. आजही ओरिजनल लापीस लाजुली क्वचितच कुठे मिळतो. आधीच्या काळात फेमस चित्रकार आपल्या पेंटिंग्ससाठी या रंगाचा वापर करत होते. हा रंग इतका दुर्मिळ होता की, कलाकारांना याची शिपमेंट मिळण्यासाठी अनेक महिने वाट बघावी लागत होती.
इतका महाग का?
कुणालाही प्रश्न पडेल की, हा रंग इतका दुर्मिळ आणि महाग का आहे? तर रंग लापीस लाजुलीचा बारीक करून बनवला जातो. लापीस लाजुली हा अफगानिस्तानात आढळणारा एक रत्न आहे. आधी राजघराण्यांमध्ये याचा वापर केला जात होता. धार्मिक कलाकृती, देवी-देवताचे चित्र बनवण्यासाठी याचा वापर होत होता. पण नंतर हा रंग बारीक करण्याची प्रक्रिया फार अवघड होत होती. म्हणून याचा वापर नंतर कमी होऊ लागला. 1820 च्या शेवटी शेवटी फ्रान्स आणि जर्मनीमध्ये सिंथेटिक अल्ट्रामरीनचा निर्माण सुरू झाला. ज्याचा वापर हा रंग बनवण्यासाठी केला जाऊ लागला.
लापीस लाजुली एक निळ्या रंगाचा दगड आहे. जो अफगानिस्तानातील डोंगरांमध्ये आढळतो. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ज्या नवरत्नांना मान्यता आहे त्यात याचा समावेश होता. तुम्ही वाचून थक्क व्हाल की, एक ग्राम लापीस लाजुलीची किंमत 83 हजार रुपयांपेक्षाही जास्त आहे. शास्त्रांमध्ये या रत्नाला फार महत्व आहे. शास्त्रांनुसार, जर राशीमध्ये शनि असेल तर लाजवर्त रत्न धारण केला पाहिजे. मकर आणि कुंभ राशीचे लोकही लाजवर्त वापरू शकतात.