भारताच्या घराघरात चहाचे सेवन केलं जाते. चहा प्यायल्याशिवाय लोकांची झोप उडत नाही. चहाचा एक घोट घेतला तरी ताजतवानं झाल्याप्रमाणे वाटतं. चहाचं नाव घेतल्यानंतर आसामचा उल्लेख केला नाही असं क्वचित होतं. आसाममध्ये चहाच्या वेगवेगळ्या प्रजातींची शेती केली जाते. नुकताच आसामच्या एका दुर्मिळ चहाच्या प्रकाराने खास रेकॉर्ड केला आहे. ही चहा पावडर लिलाव केंद्रावर ७५ हजार रुपये प्रति किलोंनी विकली गेली आहे.
मनोहारी गोल्ड टी खास प्रकारची दुर्मिळ चहापावडर आहे. गुवाहाटी येथिल लिलाव केंद्रावर या चहाची विक्री ७५ हजार रुपये प्रति किलोने झाली आहे. मनोहारी गोल्ड टी आसामधील सगळ्यात महागडी चहा आहे. या चहा पावडरच्या शेताला मनोहारी टी स्टेट म्हणतात. यावर्षी २.५ किलो या चहाचं उत्पन्न घेण्यात आले असून १.२ किलो चहा पावडरचा लिलाव झाला आहे.
मनोहारी टी स्टेटचे डायरेक्टर राजन लोहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार ही खास प्रकारची चहा पावडर असून सकाळी ४ ते ६ या वेळेत सुर्याची किरण जमिनीवर पडण्याआधी ही चहा तोडावी लागते. या चहा पावडरचा रंग हलका पिवळसर असतो. इतकंच नाही तर आपल्या सुंगंधासाठीसुद्धा ही चहा पावडर प्रसिद्ध आहे.
या दुर्मिळ प्रजातीच्या चहाची शेती आसाममध्ये ३० एकरात केली जाते. या चहाच्या पानांसह कळ्यांनाही तोडलं जातं. त्यानंतर फर्मेंटेशन प्रक्रियेतून जावे लागते. फर्मेटेशन प्रक्रियेदरम्यान या चहाचा रंग बदलतो काही प्रमाणात पांढरा होतो. सुकल्यानंतर ही चहा सोनेरी रंगांची दिसते. बाबो! नियम मोडल्याने पोलिसांनी फाडली लांबच लांब पावती, दंडाची रक्कम पाहून अवाक् व्हाल
डेक्कन हेराल्डच्या रिपोर्टनुसार लॉकडाऊन आणि पावसाचा तीव्र परिणाम आसामधील चहाच्या पीकांवर झाला आहे. चहा पावडरच्या उद्योगाला यंदाच्या साली १ हजार कोटीच्या नुकसानाचा सामना करावा लागला आहे. मनोहारी गोल्ड चहाचा लिलाव झाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. दात घासता घासता तरूणीनं चुकून टुथब्रश गिळला; X-ray रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्काच बसला