जगातलं सगळ्यात महागडं घड्याळ कोणतं ? अशी जर माहीत तुम्ही गुगलवर शोधली तर त्याची अनेक उत्तरे मिळतील. पण हे यावरही अवलंबून असतं की, ते घड्याळ व्हिंटेज घड्याळात येत किंवा नाही. पाटेक स्टीलमध्ये 2019 मध्ये 3.1 कोटी डॉलर म्हणजे साधारण 2.5 अब्ज रूपयात एका घड्याळाचा लिलाव झाला. पाटेक फिलिप हेनरी ग्रेव्स सुपरकंप्लीकेशन 2.4 कोटी डॉलर म्हणजे 2 अब्ज रूपयांना विकलं गेलं. आता पुन्हा एक घड्याळ सगळ्यात महागडं असल्याचं सांगितलं जात आहे. ज्याची किंमत आहे 2 कोटी डॉलर.
हिरेजडीत हे घड्याळ जॅकब अॅन्ड कंपनीने बाजारात आणलं आहे आणि सगळ्यात महागडं घड्याळ असल्याचा दावा केला आहे. यात इतर घड्याळांसारखेच तास, मिनिटे आणि सेकंदासाठी टूरबेलॉन आहे. हे घड्याळ अनेक रत्नांनी सजवलं आहे. यात 217 कॅरेटचे पिवळे रत्न लावले आहेत जे घड्याळाला एका बांगडीसारखे कव्हर करतात. बघितल्यावर सोन्याचा गुच्छा दिसून येईल.
कंपनीनुसार, यात फॅन्सी यलो आणि फॅंटी इंटेंस यलो रंगासाठी 425 हिऱ्यांचं डायल तयार केलं आहे. आतल्या भागातही 57 हिरे लावले आहेत. कंपनीच्या सीईओने सांगितलं की, यात रत्नांची संख्या इतकी जास्त आहे की, ते जगभरात मागवण्यात आले. ज्यासाठी साडे तीन वर्ष लागले. सगळी रत्ने आमच्या जिनेव्हा येथील मुख्यालयात आणले गेले. आम्ही काहीतरी वेगळं केलं जे जगाने आधी पाहिलं नाही.
जॅकब अॅन्ड कंपनीचं हे हिऱ्यांचं घड्याळ पहिलं नाहीये. 2015 मध्येही त्यांनी हिरेजडीत एक घड्याळ बाजारात आणलं होतं. ज्याची किंमत 1.8 कोटी डॉलर होती. व्हिंटेज घड्याळांमध्ये सगळ्यात पुढे Graff Diamonds द्वारे तयार करण्यात आलेली Hallucination आहे. यात वेगवेगळे रंग आणि कटचे 110 कॅरेटचे हिरे लावले आहेत. जे एका प्लेटिनमच्या ब्रेसलेटवर सजवले आहेत.