Most Stoppage Train: भारतीय रेल्वेचं जाळं देशभरातील कानाकोपऱ्याच पसरलेलं आहे. काही रेल्वे लांब पल्ल्याचा प्रवास करतात तर काही रेल्वे कमी पल्ल्याचा. काही रेल्वे नॉनस्टॉप धावतात तर काही रेल्वे जवळपास सगळ्याच स्टेशनांवर थांबतात. आज अशा एका रेल्वेबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी देशातील सगळ्यात जास्त स्टेशनांवर थांबणारी रेल्वे आहे. जवळपास ३७ तासांचा प्रवास करून ही रेल्वे तब्बल १११ स्टेशनवर थांबते.
रेल्वेने तुम्हीही अनेकदा प्रवास केला असेल. पण तुम्हालाही या रेल्वेबाबत माहीत नसेल. ही रेल्वे पश्चिम बंगालच्या हावडा ते पंजाबच्या अमृतसरपर्यंत धावते. हावडा ते अमृतसरपर्यंत लागणाऱ्या जवळपास सगळ्याच रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे थांबते. जवळपास १११ रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे थांबते. तर हावडा ते अमृतसरपर्यंतचा १९१० किमीचा प्रवास करण्यासाठी रेल्वेला ३७ तासांचा वेळ लागतो.
हावडा-अमृतसर मेल जवळपास ५ राज्यांमधून प्रवास करत जाते. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि पंजाब अशा ५ राज्यांमधून ही मेल प्रवास करत जाते. काही मोठ्या स्टेशनवर रेल्वे थोडा जास्त वेळ तर लहान स्टेशनवर १ ते २ मिनिटांसाठीच थांबते.
या मेलचा टाइम टेबल असा ठेवण्यात आला आहे की, जास्तीत जास्त लोक यातून प्रवास करू शकतील. हे रेल्वे हावडा स्टेशनवरून सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी निघते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी अमृतसरला पोहोचते. सगळ्यात जास्त स्टेशनवर थांबणाऱ्या या रेल्वेचं तिकिटही कमी आहे. हावडा-अमृतसर मेल स्लीपर क्लासचं तिकीट भाडे ६२५ रूपये, थर्ड एसीचे भाडे १८७० रूपये, सेकंड एसीचे भाडे २७५५ रूपये आणि फर्स्ट एसीचे भाडे ४८३५ रूपये इतकं आहे.