लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय भाग असतो. त्यासाठी प्रत्येक मुला मुलीने स्वप्न पाहिलेली असतात. खासकरून वधूवरासह इतरांनाही लग्नातील कपड्यांबाबत खूपच आकर्षण असतं. लग्नाच्या दिवशी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आपण सुंदर आणि आकर्षीत दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. सध्या सोशल मीडियावर एका तरूणीचे फोटो व्हायरल होत आहेत. या मुलीचा ड्रेस पाहून अनेकांच्य भूवया उंचावल्या आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण सिमेंटच्या गोण्यांचा वापर करून या मुलीने आपल्या लग्नाचा गाऊन तयार केला आहे.
जपानची रहिवासी असलेल्या या तरूणीचे नाव लिली टॅन असून तिने सिमेंटच्या गोण्यापासून आकर्षक ड्रेस तयार केला आहे. हा गाऊन तयार करण्यासाठी तब्बल ४० गोण्यांचा वापर केला आहे. या तरूणीच्या क्रिएटीव्हीटीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. २८ वर्षीय लिलीने ४० गोण्यांचा वापर करून मस्त, आकर्षक वेंडींग गाऊन शिवला आहे. सोशल मीडियावर या गाऊनला लोकांनी खूप पसंती दिली आहे.
लग्नासाठी तयार करण्यात आलेल्या अनोख्या वेडींग गाऊनबद्दल लिली टॅन म्हणाली की, '' गेल्या काही दिवसांपासून आपल्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे खूप सिमेंटच्या गोण्या घरात आल्या. या गोण्या पाहून माझ्या डोक्यात कल्पना आली, ही कल्पना मनात ठेवून मी काम करायला सुरूवात केली. त्यानंतर छान वेडींग गाऊन तयार केला. दरम्यान लिलीने फॅशन डिजायनिंगचा कोर्स पूर्ण केला आहे.''
याशिवाय घर सांभाळण्यासह शेतीचे कामसुद्धा लिली करते. फॅशन डिजायनिंगच्या कलात्मकतेचा वापर करून तिने आकर्षक वेडींग गाऊन तयार केला आहे. पावसाळ्यात शेतीचे काम करण्यासाठी ड्रेस तयार करण्याची लिलीची इच्छा आहे. पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करेल असा ड्रेस तयार करण्याचा लिलीचा प्रयत्न आहे. सलाम! .....म्हणून ६८ वर्षांच्या मराठमोळ्या आजी सायकलवर करताहेत २ हजार किमी प्रवास
सिमेंटच्या गोण्यापासून तयार केलेला वेडींग गाऊन तयार करण्यासाठी लिलीला जवळपास ४ तास लागले. त्यानंतर इंटरनेटवर हा फोटो पोस्ट केला. लिलीला कल्पनाही नव्हती इतका या वेडिंग गाऊनचा फोटो व्हायरल झाला आहे. कडक सॅल्यूट! रुग्णवाहिकेचा अभाव, २ रिक्षाचालकांनी तब्बल २०० रुग्णांना हॉस्पिटलला पोहचवलं