आतापर्यंत जगभरातील तुरूंग तोडण्याच्या आणि तुरूंगातून लांबच लांब भुयारी मार्ग बनवून कैदी पळाल्याच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. इतकेच काय अशाप्रकारचं कथानक असलेले अनेक सिनेमेही पाहिले असतील. पण यासंबंधी एक वेगळी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यूक्रेनमधील एका महिलेने तिच्या तुरूंगातील मुलाला वाचवण्यासाठी एकटीच तब्बल ३५ फूट भुयारी मार्ग खोदायला निघाली होती. पण ही महिला तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होण्याआधीच पकडली गेली. आता ती सुद्धा तुरूंगात आहे.
मुलाला वाचवण्यासाठी ५१ वर्षीय महिलेने पूर्ण प्लॅन केला होता. या प्लॅननुसार तिने सर्वातआधी जपोरिझिआ परिसरात भाड्याने घर घेतलं. इथेच तिचा मुलगा तुरूंगात शिक्षा भोगत होता. महिलेने कुदळ आणि फावडं घेऊन खोदकाम सुरू केलं होतं. लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ती केवळ रात्री खोदकाम करत होती. तसेच या ठिकाणी पोहोचण्यासाठी ती आवाज न येणाऱ्या स्कूटरचा वापर करत होती.
अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर महिला १० फूट भुयारी मार्ग तयार करण्यात यशस्वी ठरली. मुलाला सोडवण्यासाठी तिला साधारण ३५ फूट खोदकाम करायचं होतं. महिला जास्तीत जास्त वेळ आपल्या घरातच राहत होता. जेणेकरून स्थानिकांनी तिला ओळखू नये किंवा त्यांच्या काही लक्षात येऊ नये. अंधार होताच ती भुयारी मार्गावर पोहोचायची आणि खोदकाम सुरू करायची. ट्रॉलीच्या मदतीने ती माती बाहेर काढत होती.
महिलेने साधारण ३ आठवडे खोदकाम केलं करून ३ टन माती काढली होती. पण अखेर पोलिसांच्या नजरेतून ती वाचू शकली नाही. पोलिसांनी तिला पकडले. महिलेच्या या कारनाम्यावर टीका होत आहे. तर काही लोक मुलाला वाचवण्यासाठी तिने केलेल्या कामाचं कौतुक करत आहेत.
हे पण वाचा :
हृदयद्रावक! मुलाला रात्री नदीवर जाणं पडलं महागात, सहाव्या दिवशी सापडला मगरीच्या पोटात!
बाबो! तिखट मिरचीचे मोमोज खाणं पडलं महागात, पोटात झाला स्फोट आणि...
बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर