आई-वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेक्सिकोमध्ये राहणारी एक मुलगी प्रेमात पडली. त्या तरूणासोबत ती 9 वर्षे राहिली आणि नंतर लग्नाचा निर्णय घेतला. तरूणीने आई-वडिलांना सांगितलं. आधी तर ते तयार झाले नाही, पण नंतर त्यांनी होकार दिला. त्यांनी लग्नात येण्याचं आश्वासन दिलं. पण नंतर जे झालं ते हैराण करणारं होतं.
कपलने लग्नासाठी खूप तयारी केली. आई-वडील आणि भाऊ अमेरिकेहून आले. पण त्यांनी मुलगी आणि तिच्या होणाऱ्या पतीला हॉटेलमध्ये किडनॅप केलं. दोघांना एका रूममध्ये बंद केलं. आधी तर तिच्या होणाऱ्या पतीकडे त्यांनी 30000 डॉलरची मागणी केली. जेव्हा मुलीने नकार दिला तर आई-वडिलांनी तिला हॉटेलच्या 12व्या मजल्यावरून खाली फेकण्याची धमकी दिली.
नंतर दुसऱ्या दिवशी मुलीने पैसे देण्यास नकार दिला आणि लग्न अमेरिकेला जाऊन करून असं ठरलं. मुलगी आणि तिच्या होणाऱ्या पतीला वाटलं की, आई-वडिलांचा मूड बदलला आहे. त्यामुळे ते सुद्धा त्यासाठी तयार झाले.
पण जेव्हा ते अमेरिकेला पोहोचले तेव्हा परिवाराने दोघांना पुन्हा घरात कैद केलं. इतकंच काय तर त्यांना टॉयलेटला जाण्यासही परवानगी नव्हती. तरूणीचं कॉलेजमधील अॅडमिशन कॅन्सल केलं. तिचे सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले. काही दिवसांनी मुलीला इजिप्तला नेण्यात आलं. इथे परिवाराने तिचं लग्न एका यमन व्यक्तीसोबत ठरवलं होतं. ज्यासाठी त्यांना 500,000 डॉलर मिळाले होते. पण तिने लग्नास नकार दिला.
कुटुंबियांनी धमकी दिली की, जर तिने हे लग्न केलं नाही तर नेहमीसाठी तिला घरात कैद केलं जाईल आणि तिच्या बॉयफ्रेंडला मारलं जाईल.पोलिसांना याची कशीतरी खबर लागली आणि त्यांनी घरावर छापा मारला. तेव्हा मुलीचे आई-वडील आणि भावाला अटक करण्यात आली. त्यांच्यावर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला.
2 मार्चला त्यावर सुनावणी होणार आहे. मुलीच्या वडिलांना पाश्चिमात्य देशातील राहणीमानाबाबत अडचण आहे. त्याने कोर्टात सांगितलं की, तिथे लोक कसे राहतात. कुणासोबतही राहतात. आम्ही मध्य पूर्वेत राहणारे आहोत. आमचं राहणीमान वेगळं आहे आणि माझ्या मुलीलाही तेच शिकावं लागेल. कोर्टाने सांगितलं की, खालिद अबुघानमने मुलीला धमकावलं.