उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वेगवेगळ्या लग्नांच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. अशात एक लग्नातील (marriage) हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथील एक लग्नात नवरदेवाच्या आईनेच त्याची चपलेने धुलाई (Mother beats groom) केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात हार टाकले. अशात एक नवरदेवाची स्टेजवर चढते आणि पायातील चप्पल काढून नवरदेवाला मारू लागते. हा सगळा प्रकार महिलेने पाहुण्यांसमोर आणि नवरीसमोर केला. या घटनेचा व्हिडीओ उपस्थितांपैकी कुणीतरी रेकॉर्ड केला. ही घटना भरूवा सुमेरपूर गावातील आहे.
लग्न सुरू असताना अचानक घडलेल्या या घटनेने सगळेच हैराण झाले. कुणालाच काही समजलं नाही की, महिलेने नवरदेवाला चपलेने का मारलं. मीडिया रिपोर्टनुसार, हे प्रकरण आंतरजातीय लग्नाचं आहे. असं समजतंय की, नवरदेवाची आई या लग्नासाठी तयार नव्हती. कारण मुलगी दुसऱ्या जातीची होती. मात्र, तरूणाने परिवाराच्या विरोधात जाऊन दुसऱ्या जातीतील मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तरूण आणि तरूणीने आधीच कोर्ट मॅरेज केलं होतं. (हे पण वाचा : 'मी अल्पवयीन आहे, आताच लग्न करायंच नाही', मुलाकडील मंडळींना मुलीने केला फोन अन्....)
मीडिया रिपोर्टनुसार, नवरदेवाचे पालक आणि भाऊ त्याने केलेल्या कोर्ट मॅरेजमुळे रागावलेले होते. दुसरीकडे मुलीच्या वडिलाने कोर्ट मॅरेजनंतर दोघांचं रिसेप्शन ३ जुलैला ठेवलं होतं. मात्र, त्यांनी मुलाच्या परिवारातील कुणालाच या रिसेप्शनसाठी बोलवलं नाही.
दरम्यान, नवरदेवाची आई कशीतरी मुलाच्या लग्नात पोहोलली आणि स्टेजवर जाऊन मुलाला चपलेने मारू लागली होती. तिथे उपस्थित असलेल्या काही पाहुण्यांनी महिलेला अडवलं आणि तिला घरी पाठवून देण्यात आलं. काही वेळासाठी लग्नात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.