मुलं गमावण्याचं दुःखं काय असते, हे एका आईशिवाय दुसरं कोणीच सांगू शकत नाही. फक्त एक आईच जाणते की, तिच्यासाठी हे किती मोठं दुःखं आहे. कारण ती 9 महिने आपल्या गर्भात बाळाचा सांभाळ करते. परंतु, एका आईसोबत जे घडलं ते फारच धक्कादायक होतं. ज्या बाळाला ती मृत समजली होती. ते जवळपास 30 वर्षांनी तिच्यासमोर जिवंत येऊन उभं राहिलं. कॅलिफोर्नियाची टिना बेजार्नोने 17 व्या वर्षी एका मुलीला म्हणजेच, क्रिस्टिनला जन्म दिला होता. परंतु, त्यानंतर टिनाला तिचं बाळ दगावल्याचं सांगितलं गेलं.
बाळ दगावल्याच्या धक्क्यातून टिनाने स्वतःला सावरलं खरं पण त्याच्या आठवणीत ती दरवर्षी वाढदिवस साजर करत होती. त्यानंतर टिना इरिक गाडेरे नावाच्या एका व्यक्तीला डेट करत होती. 30 वर्षांनंतर टिनाला अचानक एक मेल आला. हा मेल न्यू जर्सी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने केला होता. त्या मेलमधून त्या व्यक्तीने टिना ज्या बाळाला मृत समजत होती, ते बाळ जिवंत असल्याचा दावा केला होता.
मेल ऑनलाइलने दिलेल्या वृत्तानुसार, टिना आणि क्रिस्टिनने आपल्या डिएनए डाटाबेस कंपनीला दिला. तपासणीनंतर त्या मुलीची आई टिनाच असल्याचं निष्पन्न झालं. डिएनए मॅच झाल्यानंतर क्रिस्टिनने टिनाला ईमेल केला आणि त्यामध्ये लिहिलं की, आपल्याला एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. कारण रिपोर्ट्समधून तुम्ही माझी आई असल्याचं निष्पन्न झालं आहे.
डीएनए टेस्टवरून सिद्ध झालं की, लहानपणी टिनाच्या बाळाचा मृत्यू झाला नव्हता. त्यावेळी टिनाने एका मुलीला जन्म दिला होता. पण आता टिनाचं बाळ एका ट्रान्सजेंडर पुरूष म्हणून राहत होतं. टिनाच्या गरोदरपणामुळे तिची आई नाखूश होती. त्यामुळे टिनाचं बाळ तिच्या आईने एका व्यक्तीला दत्तक दिलं होतं. तेव्हापासून टिनाचं बाळ लास वेगासमध्ये लहानाचं मोठं झालं होतं.
टिनाची मुलगी एक ट्रान्सजेंडर पुरूष म्हणून राहत असून तिचं कुटुंबही आहे. सध्या ते 29 वर्षांचं आहे. याबाबत टिनाचं म्हणणं आहे की, 'मला माझं मुलं पुरूषांच्या रूपात आहे की, महिलेच्या रूपात यामुळे काहीच फरक पडत नाही.'