सतना: आईसारखं दैवत साऱ्या जगामध्ये नाही असं म्हणतात. कारण आईच्या माईची, तिच्या वात्सल्याची तुलना जगात कशासोबतही होऊ शकत नाही. लेकराच्या आनंदात आई आनंद शोधते. त्याला ती तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. लेकराला जरा काही झालं की लेकरापेक्षा जास्त वेदना त्याच्या आईला होतात. मग आईसमोरच लेकराचा प्राण गेला तर..? त्या माऊलीच्या दुखा:ची कल्पनाही करवत नाही. मध्य प्रदेशातल्या एका माकडीणीचं पिल्लू १० दिवसांपूर्वी हे जग सोडून गेलं. मात्र आईचं मन ते मानायला तयार नाही. गेल्या १० दिवसांपासून आई लेकराला घेऊन फिरतेय आणि या आईला पाहणाऱ्या प्रत्येकाच्या पापण्यांच्या कडा नकळत ओलावून जा आहेत.शाब्बास रे पठ्ठ्या! कारमधून २ वर्षांची मुलगी नदीत पडली, पठ्ठ्याने तिला वाचवण्यासाठी घेतली उडी!सतनामध्ये गेल्या १० दिवसांपासून एक माकडीण तोंडात काहीतरी घेऊन फिरत असल्याचं अनेकजण पाहत आहेत. सुरुवातीला काहींना ती तोंडात खाऊ घेऊन जात असल्याचं वाटलं. मात्र नीट पाहिल्यावर तिच्या तोंडात एक पिल्लू असल्याचं लक्षात आलं. एका दुर्घटनेत १० दिवसांपूर्वी माकडिणीनं तिचं पिल्लू गमावलं. मात्र शेवटी आईचं काळीज ते. आपलं लेकरू गेलंय यावर तिचा अजूनही विश्वास नाही. आपलं लेकरू झोपलंय, ते थोड्या वेळानं उठेल असा विचार करून ती त्याला आपल्यापासून जराही लांब होऊ देत नाही.बाबो! एकाच बाईकवर अख्खी जत्रा घेऊन लग्नाला निघाला; चौकात पोलिसांनी अडवताच घडलं असं काही....माकडीणीच्या पिल्लाचा मृत्यू १० दिवसांपूर्वी झाला आहे. त्यामुळे त्याचं मृत शरीर सुकलं आहे. मात्र त्याला हृदयाशी कवटाळून माकडीण फिरत आहे. ती जिथे जिथे जाते, तिथे तिथे त्याला सोबत नेते. आपलं लेकरू उठेल, ते चालू लागेल, उड्या मारू लागेल, अशी वेडी आशा आजही तिला आहे. आपल्या लेकराचा मृत्यू अद्यापही तिनं स्विकारलेला नाही. आपलं लेकरू या जगात नाही, याच्यावर तिचा अजूनही विश्वास नाही. एकीकडे माकडांची टोळी खाण्या पिण्यात व्यग्र आहे. तर दुसरीकडे माकडीण आपलं पिल्लू डोळे उघडेल याची वाट बघतेय. माकडीणीच्या चेहऱ्यावर तिच्या लेकराबद्दलचं प्रेम, माया, त्याच्याबद्दल वाटणारी चिंता अगदी स्पष्ट दिसतेय. हे दृष्ट अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारं आहे. या माकडीणीला पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे भरून येत आहेत. शेवटी आई ती आईच, याची प्रचिती या घटनेतून येतेय.
जगावेगळी ही माया! मेलेल्या बाळाला उराशी कवटाळून १० दिवसांपासून 'ती' माकडीण फिरतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 7:28 PM