Love Story : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये पंचायतकडून महिला आणि तिच्या प्रियकराचं लग्न लावून देण्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या पतीचं निधन झालं होतं. हैराण करणारी बाब म्हणजे पहिल्या पतीकडून महिलेला 10 मुले आहेत. तेच पतीच्या मृत्यूनंतर महिला गाव सोडून प्रियकरासोबत गेली होती. असं सांगण्यात आलं की, दोघांमध्ये बऱ्याच वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि गेल्यावर्षी ती घर सोडून गेली होती.
hindi.news18 ने दिलेल्या वृत्तानुसार, महिला सोनी देवीच्या पतीचं 6 वर्षाआधी निधन झालं होतं. गोरखपुरमध्ये राहणारी सोनी 10 मुलांची आई आहे. पण पतीच्या मृत्यूनंतर सोनी शेजारी गावातील बालेंद्र उर्फ बलई यादवच्या प्रेमात पडली. बालेंद्र अविवाहित आहे. दोघांच्या नात्याची माहिती मुलांना आणि गावातील लोकांना लागली तेव्हा दोघेही एक वर्षाआधी घर सोडून पळून गेले होते.
नंतर महिला एक वर्षाने आपल्या मुलांना भेटण्यासाठी गावात पोहोचली. याची माहिती मिळताच गावात पंचायत बोलवण्यात आली. ज्यात महिला आणि तिच्या प्रियकराने सोबत रहायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर पंचायतने दोघांचं मंदिरात लग्न लावून दिलं. गावातील शिव मंदिरात बालेंद्र उर्फ बलईने सोनीच्या भांगेत कुंकू भरलं आणि तिला नेहमीसाठी आपलं केलं.
इतकंच नाही तर गावातील गुरूकुल पीजी कॉलेजचे प्रबंधक जयप्रकाश शाही आणि प्रधान प्रतिनिधी सतीश शाही यांनी सांगितलं की, दोघांचे 5 वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही एक वर्षांआधी गाव सोडून गेले होते. दोघेही परत आले तेव्हा पंचायतने दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. याने दोघेही आनंदी आहेत. महिलेच्या मुलांनाही याने काही अडचण नाही.
जयप्रकाश शाही यांनी विवाहित जोडप्याला कॉलेजमध्ये नोकरीसाठी नियुक्ती पत्रही दिलं. सोबतच गुरूकूल संस्थेच्या परिसरात त्यांना एक घर देण्याचीही घोषणा करण्यात आली. ते म्हणाले की, महिला बेघर होती. तिला घर मिळालं. तसेच अनाथ 10 मुलांना वडील मिळाले. आता महिलेला सरकारकडून मिळणाऱ्या सुविधाही मिळतील. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे.