जगभरात वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी अनेक ठिकाणी छोटं कुटुंब- सुखी कुटुंब ही घोषणा दिली जाते. अनेक जण महागाई वाढल्याने फक्त एक किंवा दोन मुलांचाच विचार करतात. मात्र न्यूयॉर्कमधील एका महिलेला हे मान्य नाही. ती घरामध्ये असलेल्या मुलांच्या संख्येने संतुष्ट नाही. 12 मुलांची आई असलेल्या या महिलेला तिची मुलं कमी वाटत आहेत.
वेरोनिकाने तिला सू रेडफोर्ड सारखं 22 मुलांच्या आईची बरोबरी करायची आहे. वेरोनिका मेरिटला पहिला मुलगा हा 14 व्या वर्षी झाला होता. 2021 मध्ये ती आपल्या दुसऱ्या पतीपासून वेगळी झाली. तिला आता असा पती हवा आहे जो कमीतकमी दहा मुलांचा बाप असेल. म्हणजे मुलांची एकूण संख्या 22 होईल.
12 मुलांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, "मला आणि माझ्या मुलांना आता पती हवा असल्याने मी त्याचा शोध घेत आहे. मला असा नवरा हवाय ज्याला आधीच मुलं असतील. जर त्याला दहा मुलं असतील तर एक मोठं कुटुंब तयार होऊ शकतं आणि तेच अत्यंत योग्य असेल. मी अशा काही लोकांसोबत आधी राहत होती. ज्याच्यासोबत मी खूश नसायची. त्यामुळे आता मी विचारपूर्वक माझा जो़डीदार निवडणार आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.