मोबाइल कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरा आल्यापासून लोकांना काही प्रायव्हसीच राहिेलेली नाही. अनेक हॉटेल रूम्स, मॉलमधील चेजिंग रूम किंवा वॉशरूमच्या आता हिडन कॅमेरे लावून लोकांचे प्रायव्हेट व्हिडीओ बनवल्याच्या घटना समोर येत असतात. पण आपल्याच परिवारातील एखादा सदस्य असे व्हिडीओ बनवण्याचं कृत्य करू शकतो का?
एका महिलेने सीसीटीव्ही टेक्निकचा असाच फायदा उचलला त्यामुळे तिच्या नात्याला काळिमा फासली गेली. ही महिला सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून मुलगा आणि सूनेचे खाजगी क्षण बघत होती. इतकंच नाही तर ते ती शेजाऱ्यांसोबतही शेअर करत होती.
तायवानमधील पत्रकार जू शेंगमेईने नुकताच एका शोमध्ये या घटनेचा खुलासा केला. हाइपच्या रिपोर्टरनुसार, लग्नानंतर कपल आई-वडिलांसोबतच राहत होतं. पण एक दिवस सगळंकाही बदललं जेव्हा शेजारी महिलेने सूनेला बोलता बोलता सांगितलं की, तुझ्या नणंदेने सांगितलं की, तू विना कपड्यात बेढब दिसते. यानंतर शेजारी महिलेने सूनेला सगळं काही बारकाईने सांगितलं तेव्हा तिला धक्का बसला.
जेव्हा सूनेने शेजारी महिलेला विचारलं की, तुला हे सगळं कसं माहीत? तर ती म्हणाली की, आम्ही तुझा व्हिडीओ पाहिला. यानंतर महिला संतापली आणि आपल्या नंणदेला याबाबत विचारण्यास गेली. तेव्हा नणंदेने सांगितलं की, तुमच्या रूममध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि तुझी सासू तुमचे खाजगी क्षण त्यात बघत असते.
महिला हे सगळं ऐकून हैराण झाली आणि तिने याबाबत पतीला सांगितलं. त्याला याचा धक्का बसला. तो याबाबत आईला विचारण्यास गेला. पण त्याच्या आईनेही अजब दावा केला. ती म्हणाली की, 'मला काही तुमची जासूसी करायची नाहीये. तुम्हाला नुकतंच बाळ झालं. मला फक्त हेच बघायचं होतं की, तुम्ही त्याची नीट काळजी घेता की नाही.'.
या घटनेनंतर परिवारात मोठा वाद झाला. त्यानंतर कपलने घर सोडण्याचा निर्णय घेतला. सोबतच ते आईला म्हणाले की, आम्ही तुला यासाठी कधीच माफ करू शकणार नाही.