ब्रिटनमध्ये एका महिलेने चॉकलेट खरेदी करताच तिला लॉटरी लागली आहे. एका क्षणातच ही महिला लखपती झाल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ५०० रुपयांच्या चॉकलेटनं महिलेला मालामाल केले आहे. लाखो रुपयांची लॉटरी लागल्यानं महिलेच्या आनंदाला पारावर उरला नाही. परंतु हे नेमकं घडलं कसं? एका चॉकलेटने महिलेला लखपती केले. जाणून घेऊया
मिळालेल्या माहितीनुसार, Nantwich च्या एका सुपरमार्केटमध्ये स्कीम सुरु होती. याठिकाणी चॉकलेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना होती. जो ग्राहक चॉकलेट खरेदी करेल त्यातील नशीबवान ग्राहकाला लॉटरी लागू शकते. कारण हे चॉकलेट सामान्य नव्हतं तर त्या एका चॉकलेटमध्ये तब्बल २५ गोल्डन तिकीट लपवण्यात आले होते. ज्याची किंमत ५ हजार पाऊंड ते १० हजार पाऊंड इतकी होती.
याचा अर्थ असा की, ज्या ग्राहकाने चॉकलेट खरेदी केले आणि त्याच्या रॅपरमध्ये तर गोल्डन तिकीट असेल तर त्याला ५ लाख ते १० लाख रुपयांची लॉटरी लागू शकते. ४३ वर्षीय महिला सियान वाकर(Sian Walker) ने तिच्या मुलासाठी चॉकलेट खरेदी केले होते. मात्र याच चॉकलेटमुळे महिलेचं नशीब उजळलं आहे. मागील आठवड्यात सियान वापर तिच्या मुलासह ५०० रुपये खर्च करून Aldi स्टोअरमधून चॉकलेट खरेदी केले. त्यावेळी त्या महिलेला याची भनकही नव्हती की या चॉकलेटमुळे तिचं नशीब बदलेल.
आईनं मुलासाठी चॉकलेट खरेदी केले. त्यात गोल्डन तिकीट मिळालं. ज्याची किंमत ५ हजार पाऊंड इतकी होती. भारतीय चलनानुसार ही रक्कम ५ लाख रुपये होती. महिलेने मिरर यूकेला सांगितल्यानुसार, या पैशाचा वापर ती तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करणार आहे. एका चॉकलेटमुळे तिची स्वप्न पूर्ण होणार यावर तिला अद्याप विश्वास बसत नाही. जेव्हा महिलेने चॉकलेट खरेदी करुन ते उघडलं तेव्हा त्याच्या आतमध्ये गोल्डन तिकीट पाहिल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. रिपोर्टनुसार, वाकर सियान एकमेव भाग्यवान ग्राहक नसून ६७ वर्षीय स्टीफन डाउलिंग यांनाही त्यांच्या वाढदिवसादिवशी गोल्डन तिकीट मिळालं. यांच्यासह २३ ग्राहकांनाही हे तिकीट मिळाल्याने सर्वांचे नशीब पालटलं आहे.