माऊंट एव्हरेस्टचं नाव तर अर्थातच तुम्ही ऐकलं असेल. सोबतच तो सर करणे किती अवघड आहे हेही ऐकून असालच. प्रत्येक गिर्यारोहकाचं माऊंट एव्हरेस्ट करण्याचं स्वप्न असतं. पण सगळेच हे करू शकत नाहीत. कधी कधी तर काही लोक परतही येऊ शकत नाहीत. पण एक व्यक्ती अशी आहे ज्याने स्वत:चाच रेकॉर्ड मोडला आहे. जगातल्या सर्वात उंच पर्वतावर त्याने एक, दोन किंवा तीन नाही तर तब्बल २३ वेळा जाण्याच रेकॉर्ड केलाय.
कामी रीता शेरपा असं या ४९ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती नेपाळला राहणारी आहे. त्याने २३ वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि स्वत:च रेकॉर्ड मोडला. कामी यांनी तब्बल २३ वेळा ह्या शिखराची ८,८४८ मीटर उंची म्हणजेच २९,०२९ फूट उंची पार केली आहे.
पहिल्यांदा कधी केली चढाई
कामी यांनी पहिल्यांदा १३ मे १९९४ मध्ये एव्हरेस्ट सर केला होता. शेरपा समुदायाचे लोक गिर्यारोहकांसोबत ग्रुपसोबत त्यांची मदत करण्यासाठी जात असतात. असे मानले जाते की, या शेरपा लोकांच्या मदतीशिवाय एव्हरेस्ट सर केला जाऊ शकत नाही. हे एव्हरेस्ट सर करताना लागणारी हत्यारे आणि राहण्या-खाण्याच्या वस्तू सोबत घेऊन चालतात.
४१ टिमसोबत केला आहे काम
कामी यांनी त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत ४१ टीमसोबत काम केलं आहे. इतकेच नाही तर आतापर्यंत त्यांनी ३७८ गिर्यारोहकांसोबत एव्हरेस्टचा प्रवास केला आहे.