हृदयद्रावक! घरी पडून होता पत्नीचा मृतदेह, सायकलने १३ तासात १३० किमी प्रवास करून पोहोचला पती...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:12 AM2021-05-12T10:12:32+5:302021-05-12T10:30:18+5:30

पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर १३० किलोमीटर दूर राहणाऱ्या पतीला घरी येण्यासाठी काहीच साधन मिळालं नाही. पण त्यांनी हार मानली नाही.

MP : After wife death husband traveled 130 km in 13 hours by bicycle for last rites | हृदयद्रावक! घरी पडून होता पत्नीचा मृतदेह, सायकलने १३ तासात १३० किमी प्रवास करून पोहोचला पती...

हृदयद्रावक! घरी पडून होता पत्नीचा मृतदेह, सायकलने १३ तासात १३० किमी प्रवास करून पोहोचला पती...

Next

कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशा स्थितीतही काही लोक असेही आहेत जे समोर येणाऱ्या अडचणींना धाडसाने तोंड देत आहेत. अनेक हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर आल्या येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. जी वाचून मनाला चटका नक्कीच बसेल. पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर १३० किलोमीटर दूर राहणाऱ्या पतीला घरी येण्यासाठी काहीच साधन मिळालं नाही. अशात पती १३ तासांचा प्रवास सायकलने प्रवास करून पत्नीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाला.

इंदुरपासून १० किलोमीटर अंतरावर तलावलीमध्ये राहणारे रवि शंकर पंवार यांचं लग्न १९८६ मध्ये मालीपुरा आगर येथील सुमन यांच्यासोबत झालं होतं. मानसिक रूग्ण असल्याने सुमन या गेल्या काही महिन्यांपासून माहेरीच राहत होत्या. काही दिवसांपूर्वी पाय घसरून पडल्याने सुमन यांची स्थिती गंभीर आणि नाजूक झाली होती. ८ मे रोजी सुमन यांचं निधन झालं. सुमन यांच्या कुटुंबियांनी रवि शंकर यांना ही दु:खद बातमी दिली. मात्र, रवि शंकर त्या दिवशी जाऊ शकत नव्हते. कारण त्यांची वहिणीं त्या दिवशी दहावं होतं. वहिणीचं कार्य पूर्ण करून रवि शंकर आगरला जाण्यासाठी वाहन शोधत होते. पण त्यांना काही मिळालं नाही. (हे पण वाचा : सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत')

अशात प्लंबरचं काम करणारे रवि शंकर यांनी कसंही करून आगरला जाण्याचा आणि पत्नीला शेवटचं बघण्याचा निश्चय केला. सायंकाळी ५ वाजता ते आपल्या गावातून निघाले. रात्रीच्या अंधारात ते रस्त्यावर थर्माप्लास्टिकच्या पांढऱ्या पट्टीच्या आधारे सायकल चालवत सकाळी ७ वाजता आगरला पोहोचले. या प्रवासात त्यांनी केवळ १ तास आराम केला. रस्त्यात त्यांनी चहा, नाश्ता काही घेतलं नाही. कारण सगळीकडे दुकाने बंद होती.

रवि शंकर यांनी थोडं जेवण सोबत घेतलं होतं. ते त्यांनी रस्त्यात खाल्लं. पाणीही ते घरून घेऊन आले होते. मात्र, पाणी संपलं. पाण्याची गरज होती. पण त्यांनी हार मानली नाही. रवि शंकर यांना आगरला सायकलने येताना पाहून त्यांच्या सासरचे लोक थक्क झाले. रवि शंकर यांनी सांगितले की, जर रात्र नसती तर ते ७ तासात आगरला पोहोचले असते. इतका प्रवास करून रवि शंकर पत्नीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते.
 

Web Title: MP : After wife death husband traveled 130 km in 13 hours by bicycle for last rites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.