कोर्टरूम ड्रामा; आजी-आजोबांच्या 'युती'साठी मागवली शेव अन् दिली साईबाबाची शपथ!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 02:56 PM2019-11-28T14:56:21+5:302019-11-28T14:56:32+5:30
संसार म्हटला की, भांडणं आलीच...पण नवरा-बायकोची भांडणं कशावरून होतील हे काही कुणाला सांगता येणार नाही.
संसार म्हटला की, भांडणं आलीच...पण नवरा-बायकोची भांडणं कशावरून होतील हे काही कुणाला सांगता येणार नाही. मोबाइलवरून झालेलं भाडण तुम्ही ऐकलं असेल, नातेवाईकांमुळे झालेलं भांडण तुम्ही ऐकलं असेल पण तुम्ही कधी एखाद्या भाजीवरून भांडण झाल्याचं पाहिलं का? नसेल ऐकलं तर अशीच एक घटना समोर आली आहे. एका भाजीमुळे भांडण झाल्याने नवरा-बायको तब्बल १७ वर्ष एकमेकांपासून दूर राहिले. आता १७ वर्षांनंतर कोर्टाने हे प्रकरण मिटवलं आहे.
ही घटना आहे मध्य प्रदेशातील देवासची. येथील आजी-आजोबांच्या वयाच्या एका जोडप्याचं भाजीवरून भांडण झालं होतं. पतीने शेवभाजी करण्याची इच्छा व्यक्ती केली होती. पण पत्नीने काही शेवभाजी केली नाही. झालं याकारणाने दोघे १७ वर्ष एकमेकांपासून वेगळे राहिले. आता कोर्टाने हा वाद मिटवला. पत्नीने पतीला १७ वर्षांनी शेवभाजी करून खाऊ घातली आणि हा वाद मिटला.
दैनिक भास्करने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, सध्या या पतीचं वय ७९ तर पत्नीचं वय ७२ आहे. पतीने रिटायरमेंटनंतर मिळालेला पैसा पत्नीच्या नावावर केला होता. देवासमधील त्यांचं घरही पत्नीच्या नावावर आहे. तसेच पेन्शनची रक्कमही पत्नीच्या अकाऊंटमध्ये जाते. पण रिटायरमेंटच्या दोन दिवसातच दोघांमध्ये भाजीवरून भांडण झालं होतं.
असे सांगितले जात आहे की, पतीने पत्नीकडे शेवभाजी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पत्नी यासाठी पतीला शेव आणून द्या असं सांगितलं. यावर पतीने पत्नीकडे पैसे मागितल्यावर पत्नीने त्यांना नको नको ते ऐकवलं. पैशांवरून दोघांमध्ये मोठं भांडण झालं. शेवटी झालं असं की, पत्नीने भाजी बनवली नाही. तेच संतापलेल्या पतीने सकाळी काही न सांगताच घर सोडलं.
रिपोर्टनुसार, पती बुलडाण्यातील मोताडा या गावात राहू लागले. इतकेच नाही तर पेन्शनची रक्कमही स्वत:च्या अकाऊंटमध्ये येईल अशी व्यवस्था करून घेतली. म्हणजे पत्नीच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणे बंद झाले. मग काय हे प्रकरण थेट कोर्टात गेलं. २०१६ मध्ये जिल्हा न्यायालयात केसची सुनावणी सुरू झाली. पत्नीला हेही माहीत नव्हतं की, पती कुठे आहेत.
चौकशी केल्यावर समोर आले की, पती बुलडाण्यातील एका गावात आहेत. पोलिसांनी पतीला कोर्टात आणून उभं केलं. पतीने घडलेला सगळा प्रकार कोर्टासमोर सांगितला. हे प्रकरण ऐकून न्यायाधिशही हैराण झाले. त्यानंतर त्यांनी दोघांशी बातचीत केली.
अखेर कोर्टाने दोघांमधील वाद मिटवण्यासाठी ५० रूपयांचं शेवाचं पॅकेट मागवून घेतलं. पत्नीला सांगण्यात आले की, पतीसाठी शेवभाजी करा. दोघे कोर्टातून सोबत घरी गेले. पत्नी पतीसाठी शेवभाजी केली. नंतर पुन्हा कोर्टात गेले. दोघांनीसोबत राहण्याची तयारी दर्शवली. पण पतीने पुन्हा पत्नी भांडण करणार नाही, याची श्वाश्वती मागितली. यावर पतीच म्हणालीकी, पत्नीने साईबाबांची शपथ घ्यावी की, असं पुन्हा करणार नाही. कोर्टाने दोघांना शिरडीला पाठवले. पत्नी शपथ घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही एकत्र आल्याने आनंदी आहेत.