VIDEO : प्रियकराच्या लग्नात हॉलबाहेर प्रेयसीचा आक्रोश, ती बाबू-सोना म्हणत राहिली पण....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 02:36 PM2021-07-09T14:36:57+5:302021-07-09T14:37:54+5:30

दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणाऱ्या प्रियकराच्या लग्नात जाऊन प्रेयसीने गोंधळ घातल्याचा हा व्हिडीओ आहे. यावेळी प्रेयसीला लग्न मंडपातून बाहेर हाकलण्यात आलं.

MP : Girlfriend who came to her boyfriends wedding messed up in Hoshangabad | VIDEO : प्रियकराच्या लग्नात हॉलबाहेर प्रेयसीचा आक्रोश, ती बाबू-सोना म्हणत राहिली पण....

VIDEO : प्रियकराच्या लग्नात हॉलबाहेर प्रेयसीचा आक्रोश, ती बाबू-सोना म्हणत राहिली पण....

Next

सोशल मीडियावर एक भावूक करणारा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणाऱ्या प्रियकराच्या लग्नात जाऊन प्रेयसीने गोंधळ घातल्याचा हा व्हिडीओ आहे. यावेळी प्रेयसीला लग्न मंडपातून बाहेर हाकलण्यात आलं. पण हॉलच्या गेटबाहेर ती बाबू-सोना अशी हाक मारत आपल्या प्रियकराला साद देत राहिली. पण कुणी तिचं काहीच ऐकलं नाही. 

ही घटना होशंगाबाद शहरातील आहे. या घटनेची माहिती मिळताच एसआय श्रद्धा राजपूत आणि पोलीस मॅरेज हॉलजवळ पोहोचले. त्यांनी तरुणीला गाडीमध्ये बसवलं. या सर्वाचं कारण विचारलं. यावेळी तरुणीने पोलिसांना सांगितलं की, तिचा प्रियकर आणि ती तीन वर्षांपासून पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते (Live in Relationship). मात्र, प्रियकराने तिला दगा देत दुसऱ्या तरूणीसोबत लग्न केलं.

यावर पोलिसांनी तिला सांगितलं की, प्रियकरावर कारवाई करायची असेल तर रितसर तक्रार कर. मात्र तरूणीन कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यास नकार दिला. यानंतर ही तरुणी भोपाळला परत गेली. ही तरुणी कानपूरची राहणारी आहे. ज्या तरुणाच्या लग्नात तिनं गोंधळ केला तो होशंगाबाद जिल्ह्यातील एका गावातील आहे. दोघंही भोपाळमधील एका खासगी कंपनीत काम करतात.

तरुणीने सांगितलं की, दोघेही तीन वर्षांपासून पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते. ती प्रियकराला विचारायची की तुझं दुसरं कोणासोबत लग्न होणार आहे का? यावेळी तो मी दुसऱ्या कोणासोबत लग्न करणार नाही, असं उत्तर द्यायचा. मात्र, गुरुवारी त्यानं लपून दुसऱ्याच मुलीसोबत लग्नगाठ बांधली. 
 

Web Title: MP : Girlfriend who came to her boyfriends wedding messed up in Hoshangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.