पती, पत्नी आणि मेहुणी..पत्नीच्या परवानगीनंतर एकाच मांडवात लग्न, पण का केलं असं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 12:46 PM2019-12-09T12:46:57+5:302019-12-09T12:50:54+5:30
महिला सरपंच विनीताचा पती दिलीपने त्याची पत्नी आणि मेहुणीसोबत एकाच मांडवात लग्न केलं. त्यामुळे जिल्ह्यात या लग्नाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
(Image Credit : Jagran.com)
मध्यप्रदेशातील एक लग्न सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. झालं असं की, इथे एका नवरदेवाने एकाच मांडवात दोन बहिणींशी लग्न केलं. मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील ही घटना आहे. या व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या बहिणीसोबत लग्न केलं. त्याच मांडवात त्याने त्याच्या पत्नीशी पुन्हा लग्न केलं.
भिंड जिल्ह्यातील मेहगांव जनपदमधील गुदावली गावातील ही घटना आहे. महिला सरपंच विनीताचा पती दिलीपने त्याची पत्नी आणि मेहुणीसोबत एकाच मांडवात लग्न केलं. त्यामुळे जिल्ह्यात या लग्नाची चांगलीच चर्चा सुरू आहे. दरम्यान दिलीप आणि विनीताचं लग्न ९ वर्षांआधीच झालं आहे. त्यांना तीन अपत्ये देखील आहेत.
बायकोनेच दिली परवानगी
(Image Credit : NBT)
दिलीपने सांगितले की, हे लग्न करण्यासाठी त्याची पत्नी विनीतानेच त्याला परवानदी दिली. त्यानंतर विनीताची चुलत बहीण रचनासोबत लग्न केलं. स्टेजवर दोन्ही नवरी एकत्र सोबत होत्या. दिलीपने पत्नी विनीतासोबत रचनाच्या गळ्यात हार घातला आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला.
पण का केलं दुसरं लग्न?
आता प्रश्न हा उभा राहतो की, दिलीपने आधी एक लग्न झालेलं असताना देखील दुसरं लग्न का केलं? दिलीपने सांगितले की, त्याच्या पहिल्या पत्नीची तब्येत ठीक राहत नाही. मुलं लहान आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी त्याने दुसरं लग्न केलं. इतकेच नाही तर दिलीप म्हणाला की, त्याला त्याची मेहुणी रचना आधीच पसंत होती. जेव्हा दुसऱ्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा त्याने ही बाब सर्वातआधी पत्नीला सांगितली. तिच्या परवानगी नंतरच त्याने हे लग्न केलं.