दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक अजब घटना समोर येत असतात. यातील काही हैराण करणाऱ्या तर काही विचारात पाडणाऱ्या असतात. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातून अशीच एक अजब घटना समोर आली आहे जी वाचून सगळेच हैराणही झाले आणि विचारातही पडले. इथे पोलिसांनी बेकायदेशीर दारूच्या एका केसमध्ये एखाद्या व्यक्तीला नाही तर एका उंदराला अटक केली आहे.
पोलिसांनी या उंदरावर 60 बॉटल बेकायदेशीर दारू पिण्याचा आरोप लावला आहे. असं सांगण्यात आलं की, या तहानलेल्या उंदराने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बेकायदेशीर दारूच्या पेटीतील 60 बॉटल रिकाम्या केल्या. त्यानंतर उंदराला नशेत इकडे-तिकडे पडताना पाहिलं. पोलिसांनी या उंदराला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. पोलिसांनी सांगितलं की, एका उंदराने 60 बॉटल दारू पिणं शक्य नाही. पण त्यांच्या आजूबाजूला केवळ एकच उंदीर पकडण्यात आला. त्यामुळे पूर्ण आरोप याच उंदरावर लावण्यात आला.
परदेशातही घडल्या अशा घटना
जर तुम्हाला वाटत असेल की, अशा घटना केवळ भारतातच घडतात. तर तुम्ही चुकीचे आहात. ब्रिटनमध्येही अशा प्राण्यांची कमतरता नाही जे नशेचे पदार्थ चोरी करू नशा करतात. ब्रिटनमध्ये एका प्राण्याने बीअर पिण्यासाठी अनेक घरी हल्ला केला. तो घरात जाऊन दारू पिऊन पळून जात होता. आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की, भारतातील या केसमध्ये काय होतं? उंदराला शिक्षा दिली जाईल की त्याला सोडलं जाईल?