Farming Success Story : आहाराच्या उत्पादनांमध्ये कृत्रिम पदार्थांना वैतागून बोंगुराम नागराजूने तेलंगणाच्या हब्सीपूर गावात आपल्या जैविक शेती करण्यासाठी हैद्राबाद सोडलं. या ३२ वर्षीय तरूणाकडे Animal Biotechnology मधील एमएससीची डिग्री आहे. जी त्याने हैद्राबाद विश्वविद्यालयातून मिळवली होती. तो भारत बायोटेकमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत काम करत होता. पण त्याला तिथे नेहमीसाठी काम करायचं नव्हतं.
तेलंगणा टुडेनुसार, त्याने शहरातील चांगल्या नोकरीवर पुनर्विचार केला आणि नोकरी सोडून तो गावी परतला. नागराजूला सेंद्रिय शेती करायची होती. त्याच्या गावातील लोक देशी तांदळाच्या प्रजातीचीं शेती करत नव्हते. गावी परत आल्यावर त्याने देशी धानाची शेती करण्यावर भर दिला. त्याने कृत्रिम कीटकनाशक दूर केले. त्याऐवजी शेण आणि कडूलिंबाच्या तेलाचा वापर केला.
त्याच्या ज्ञानासाठी आणि वेगवेगळ्या प्रयोगांसाठी गांधी ग्लोबल फॅमिलीने नागराजूचा पुदामी पुत्र पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यासोबतच तेलंगणातील शेतकऱ्यांना शिक्षित करण्यासाठी डेक्कन मुद्रा, ग्रामी भारती संघटना आणि सुभिक्षा कृषी फाउंडेशनसोबत काम करत आहे.
नागराजूचा परिवार आणि त्याच्या सासरचे लोक शहरातील नोकरी सोडण्याच्या विरोधात होते. हैद्राबादमध्ये एका कॉर्पोरेट स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी करत असलेल्या त्याच्या पत्नीने आपली नोकरी सोडली. तेव्हापासून कपल स्वदेशी धानाच्या वेगवेगळ्या प्रजातींची शेती करत आहे. कपलने ४.५ एकरात मणिपूर काळा तांदूळ, कलाबती, तेलंगणा सोना, बर्मा काळा तांदूळ यांची शेती केली. तर काही भागात त्याने भाज्या आणि फळांचीही शेती केली.
नागराजूने तेलंगणा टुडेला सांगितलं की, धानाची शेतीतून त्याला चांगला पैसा मिळत आहे. पण ते उत्पादनाचं प्रकार वाढवत आहे. तो आता शेळी पालन आणि कोंबडी पालन यांचाही शेतात समावेश करणार आहे.