देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी केवळ महागड्या घरात राहतात असे नाही तर कारही देशातील सर्वात महागडी वापरतात. मुकेश अंबानी आपल्या बीएमडब्ल्यू ७६० एलआयने प्रवास करतात. या कारमध्ये अनेक मॉडिफिकेशन्सही केले आहेत. ज्यामुळे या कारची किंमतही अनेक कोटींनी वाढली आहे.
जगातील सर्वात सेफ कार
बीएमडब्ल्यू ७६० एलआय कारमध्ये करण्यात आलेल्या मॉडिफिकेशनमुळे ही जगातील सर्वात सेफ कार बनली आहे. मुकेश अंबानी यांनी मुंबईतील मोटर व्हेईकल डिपार्टमेंटमध्ये १.६ कोटी रुपये रजिस्टर्ड कॉस्ट दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतामध्ये यापूर्वी कार रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुणीही इतकी फिज दिली नाहीये.
कारची किंमत
बीएमडब्ल्यू ७६०एलआय या गाडीची ऑन रोड किंमत १.९ कोटी रुपये आहे. मात्र, अंबानी यांची झेट सिक्युरीटी पाहता आणि त्यांच्या गरजेनुसार बीएमडब्ल्यूने कारमध्ये अनेक बदल केले आहेत. तसेच, आर्म्ड कारच्या इम्पोर्ट ड्युटीवर ३०० टक्के टॅक्स लागतो. त्यामुळे या कारची किंमत ८.५ कोटी रुपये आहे.
बुलेट प्रूफ विंडो
मुकेश अंबानी यांच्या आर्म्ड बीएमडब्ल्यू ७६० एलआय वीआर७ ब्लास्टिक प्रोटेक्शनसाठी तयार आहेत. या कारच्या डोर पॅनलमध्ये प्लेट्स आहेत. प्रत्येक विंडो ६५ एमएम जाड आणि १५० किलो वजनाच्या असुन बुलेट प्रूफ आहेत. आर्मी ग्रेड हत्यार, हँड ग्रेड, १७ किलोग्राम वजनापर्यंत हाय इंटेन्सिटी ब्लास्टचा या कारवर कुठलाही परिणाम होणार नाही.
अजूनही आहे खास
बीएमडब्ल्यूच्या फ्युअल टँकला सेल्फ सिलिंग केवलरने बनविल्यामुळे त्यात आग लागणार नाही. या कारवर केमिकल अटॅक झाल्यासही काही फरक पडणार नाही. तसेच आपातकालीन परिस्थीतीत कारमध्ये ऑक्सिजनचा वापरही करता येतो. या कारमध्ये डबल लेयर्सचे टायर्स लावण्यात आले आहेत.