आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रातून उत्साहात साजरी करण्यात आली. एका एनिमेशन आर्टिस्टने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून एक सुंदर प्रतिमा तयार केली आहे. प्लास्टिकचा वापर करून ही प्रतिमा तयार करण्यात आली आहे. हा पराक्रम करून या कलाकाराने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या कलाकाराचं नाव नितिन दिनेश कांबळे असं आहे.
नितिनने १० दिवसात १० फुट उचींची आणि ८ फुट चौडी एक प्रतिमा तयार केली आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा तयार करताना सहा वेगवेगळ्या रंगाचे ४६ हजार प्लास्टीकचे तुकडे एकत्र करून ही प्रतिमा तयार केली आहे. असं नितिनने एएनआईशी बोलताना सांगितलं.
प्लास्टीक बंदी असताना सुद्धा अत्यंत प्रभावी पद्धतीने नितिने ही उल्लेखनीय कामगिरी केली. नितिनच्या कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे.