मुंबईचा वडापाव जगभरात प्रसिद्ध आहे. केवळ मुंबईतच नाही तर देशाबाहेरही वडापाव आवडीने खाल्ला जातो. नुकतंच वडापावबाबत एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. सामान्यपणे मुंबईमध्ये कुणालाही १० ते २० रूपयात वडापाव मिळतो. इतकंच नाही तर चांगल्या दुकानांमध्ये जाऊ वडापाव ऑर्डर केला तर त्याचं मूल्य १०० रूपयाच्या आत असेल. पण तुम्ही कधी २००० रूपये किंमतीचा विडापाव खाल्लायं?
दुबईत मिळतो २ हजार रूपयांचा वडापाव
आता इतकी किंमत आहे म्हटल्यावर यात असं काय आहे की, याची किंमत इतकी जास्त आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. चला तर जाणून घेऊ कारण. दुबईतील एका दुकानात वडापावची किंमत 100 UAE म्हणजे जवळपास २ हजार रूपये ठेवण्यात आली आहे. पण यात इतकं काय खास आहे की, हा वडापाव २ हजारांचा आहे?
मुंबईचं सर्वात आवडतं स्नॅक्स वडा पाव जगातील पहिला २२ कॅरेटचा गोल्ड प्लेटेड वडापाव आहे. ज्याला ट्रफल बटर आणि चीजपासून बनवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर तोंडात पाणी आणणाऱ्या या वडापाववर २२ कॅरेट सोन्याचा अर्क लावण्यात आलाय. ज्यामुळे या वडापावची किंमत इतकी जास्त आहे. मशरत दाउदने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला १३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.