काही वर्षांपूर्वी पोर्नोग्राफी एका वर्गापर्यंतच मर्यादीत होती. पण आज याला काही सीमा राहिलेल्या नाहीत. फोन, लॅपटॉप आणि सोशल मीडियाने याला एक मोठं रूप मिळालं आहे. २०१३ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, सर्वातजास्त बघितल्या जाणाऱ्या पॉर्न दृश्यांपैकी ९० टक्के दृश्यांमध्ये महिलांविरोधात हिंसा आणि अपमानजनक व्यवहार असतो. त्यामुळे एक वेगळाच प्रभाव पॉर्न बघणाऱ्या तरूण किंवा लहान मुला-मुलींवर होतो.
जर तुम्हाला कुणी सांगितलं की, काही माता स्वत: त्यांच्या मुला-मुलींसाठी अॅडल्ट फिल्म तयार करत आहे. तर कुणीही याकडे केवळ गंमत बघेल. पण ही गंमत नसून खरं आहे. ब्रिटनमध्ये असं होणार आहे. इथे चार महिला त्यांच्या मुलांसाठी अॅडल्ट फिल्म तयार करत आहेत.
(Image Credit : dailymail.co.uk)
मीडिया रिपोर्ट्सनुसार ब्रिटनमध्ये महिलांचा एक समूह त्यांच्या मुला-मुलींसाठी पॉर्न फिल्म तयार करत आहे. ही अॅडल्ट फिल्म महिलांच्या मुला-मुलींसाठी बघण्यायोग्य तयार केली जाणार आहे. हे पाऊल शारीरिक संबंध आणि लैंगिक जीवनासंबंधी मुला-मुलींमध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणण्यासाठी उचललं आहे.
चॅनल ४ वर येणारा ब्रिटीश शो 'मॉम्स मेक पॉर्न'वर काम सुरू झालं आहे. एकूण १५ मुला-मुलींसोबत ४ महिला आहेत. हा तीन भागांमध्ये दाखवला जाणार आहे. यात महिलांचा पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव सुद्धा दाखवला जाणार आहे. पण या ५ महिलांचा पॉर्न इंडस्ट्रीसोबत काहीही संबंध नाही. त्या या व्हिडीओमध्ये स्वत: काम करणार नाहीत. केवळ लैंगिक शिक्षण सकारात्मक रूपाने दाखवलं जावं यासाठी मदत करतील. डॉक्यूमेंट्रीमध्ये सांगण्यात आलं आहे की, ब्रिटनमध्ये जेवळपास एक तृतियांश इंटरनेट ट्रॅफिक हे हार्डकोर पॉर्नमधून येतं.
(Image Credit : dailymail.co.uk)
आपल्या खाजगी क्षणात लोक पॉर्न बघण्याला वाईट मानत नाहीत. पण शोधानुसार, पॉर्न बघितल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. खासकरून लहान मुला-मुलींवर, नॉर्टन सिमॅन्टेकच्या रिसर्चमधून हे समोर आलं होतं की, जर भारतीयांना इंटरनेट मोफत मिळालं तर ते याचा वापर सर्वात जास्त पॉर्न बघण्यासाठी करतील.
एका दुसऱ्या रिसर्चनुसार, हॉटेलच्या वाय-फायवर ४९ टक्के लोक भारतीय पॉर्न बघतात. तर जगातील ४० टक्के लोक पॉर्न बघतात. याच रिसर्चमधून हेही समोर आलं होतं की, भारतात प्रत्येक तीसरी व्यक्ती फ्रि वाय-फायवर अॅडल्ट कंटेन्ट बघतात. तर जगभरात प्रत्येक सहावी व्यक्ती असं करतात.